शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मंडळनिहाय आॅनलाईन वर्क स्टेशन

By admin | Updated: September 16, 2016 01:52 IST

महसूलच्या शेतीविषयक कामकाजाला आॅनलाइनची जोड दिल्यानंतर शासन आता मंडळनिहाय आॅनलाइन वर्क स्टेशन अमलात आणण्याच्या तयारी आहे.

संतोष वानखडे , वाशिममहसूलच्या शेतीविषयक कामकाजाला आॅनलाइनची जोड दिल्यानंतर शासन आता मंडळनिहाय आॅनलाइन वर्क स्टेशन अमलात आणण्याच्या तयारी आहे. या आॅनलाइन वर्क स्टेशनला मूलभूत सुविधा अगोदर पुरवाव्या, या मागणीसाठी विदर्भ मंडळ अधिकारी संघटना आक्रमक झाली आहे.जानेवारी २०१६ पासून जमिनीचे हस्तांतरण प्रकरणाच्या कार्यवाहीला आॅनलाइनची जोड मिळाली. ई-फेरफार पद्धती वाशिमसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली. आॅनलाइन फेरफार पद्धतीच्या माध्यमातून जमिनीचे अधिकार, अभिलेख, सातबाराचे अद्ययावतीकरण करून संबंधित शेतकऱ्याला त्याच्या जमिनीचा सातबारा महासेतू किंवा इंटरनेटच्या माध्यमातून बिनचूक व अद्ययावत मिळावा, या शासनाचा हेतू होता; मात्र जमिनीच्या फेरफार नोंदीसाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी व तसेच तत्सम साहित्य तलाठी व मंडळ अधिकारी संवर्गाला पुरविल्या न गेल्याने शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रासाठी फेऱ्या माराव्या लागल्या. या सर्व बाबींचा विचार करून शासनाने आता महसूल मंडळनिहाय आॅनलाइन वर्क स्टेशन निर्माण करण्याचा निर्णय घेतला. शासनाचा हा निर्णय अत्यंत चांगला आहे; मात्र त्याचबरोबर या वर्क स्टेशनला मूलभूत सुविधा पुरविणेदेखील महत्त्वाचे असल्याचा पवित्रा विदर्भ मंडळ अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. संबंधित महसूल मंडळवार मंडळ अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची शासकीय इमारत, विद्युत पुरवठा, मंडळ अधिकारीनिहाय लॅपटॉप, प्रिंटर ज्या मंडळावर शासकीय इमारत नसेल तेथे इमारत भाडेतत्त्वावर घेण्यासाठी मंडळ अधिकारी संवर्गाकरिता कार्यालयीन भाडे, पुरेसे फर्निचर, इंटरनेट जोडणी व मंडळाच्या ठिकाणी आॅनलाइन कामाकरिता आलेल्या शेतकऱ्यांना बसण्यासाठी जागा या मूलभूत सुविधा निर्माण करण्याची मागणी या संघटनेने लावून धरली आहे.जिल्हा प्रशासनाला २० ते २५ हजार रुपये पुरवून मंडळनिहाय आॅनलाइन वर्क स्टेशन निर्माण करण्याचे प्रस्तावित आहे. या वर्क स्टेशनसाठी मूलभूत सुविधांचा वस्तुनिष्ठ तपासणी अहवाल शासनाला मागविला आहे. अद्याप विदर्भातील काही जिल्ह्यांना हा अहवाल प्राप्त झाला नसल्याची माहिती आहे. केवळ व्हॉट्स अ‍ॅपसारख्या माध्यमातून मंडळ अधिकारी संवर्गात वर्क स्टेशन निर्माण करण्याच्या सूचना दिल्या जात असल्याची माहिती विदर्भ मंडळ अधिकारी संघटनेला मिळत आहे, अशी खंत विदर्भ मंडळ अधिकारी संघ, नागपूरचे अध्यक्ष डी.के. काटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.