शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरची घरपोच सेवा बंद

By admin | Updated: June 8, 2016 01:59 IST

करावे गाव व सीवूड सेक्टर ४६ परिसरामध्ये इंडेन गॅसचे वितरक ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत सेवा देत नाहीत.

नवी मुंबई : करावे गाव व सीवूड सेक्टर ४६ परिसरामध्ये इंडेन गॅसचे वितरक ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत सेवा देत नाहीत. नेरूळ स्टेशनमधील कार्यालयात जावून सिलिंडर घ्यावा लागत असून, घरी घेवून जाण्यासाठी रिक्षाला ६० रुपये मोजावे लागत आहेत. तक्रारी करूनही एजन्सी चालक याकडे दुर्लक्ष करत आहेत. सीवूड सेक्टर ४६ मधील साईकृपा सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यावर राहणारे किरण ढेबे यांनी दोन वर्षांपूर्वी इंडेन गॅसकडे (ग्राहक क्रमांक ७५६५) नोंदणी केली आहे. एजन्सीचे कार्यालय नेरूळ स्टेशनच्या इमारतीमध्ये असून सेक्टर ४६ पासून हे अंतर जवळपास तीन किलोमीटर आहे. सिलिंडर संपल्यानंतर त्याची आॅनलाइन नोंदणी केली जाते. परंतु नोंदणी केल्यानंतर सिलिंडर घरापर्यंत पोहचविला जात नाही. दोन वर्षापासून ते स्वत:च एजन्सीच्या कार्यालयातून सिलिंडर घेवून जात आहेत. करावे गाव व परिसरातील बहुतांश नागरिकांना नेरूळमध्ये येवून स्वत: सिलिंडर घेवून जावे लागत आहे. नेरूळमधून रिक्षा चालक सीवूडला येत नाहीत. तेथे जायचे असेल तर रिक्षाचालक सांगतील तेवढे पैसे द्यावे लागत आहेत. किमान ५० ते ६० रुपये द्यावे लागत आहेत. विनाकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नागरिकांमध्ये असंतोषसिलिंडर घरापर्यंत पोहचविण्याची मागणी ग्राहकांनी वारंवार केली आहे. परंतु एजन्सी चालक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. एजन्सी चालकाकडे तक्रारवही मागितल्यानंतर तीही दिली जात नाही. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढू लागला असून आंदोलन करण्याचा पवित्रा अनेक नागरिकांनी घेतला आहे.