शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

घनवट, चंदनशिवेच्या सांगलीतील निवासस्थानावर ‘सीआयडी’चे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 10:38 IST

सव्वानऊ कोटीच्या चोरीप्रकरणी अटकेतील निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट व सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्या सांगलीतील निवास्थानावर राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने शुक्रवारी मध्यरात्री छापे टाकले.

सांगली, दि. 6 - वारणानगर (जि. कोल्हापूर, ता. पन्हाळा) येथील सव्वानऊ कोटीच्या चोरीप्रकरणी अटकेतील निलंबित पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट व सहायक निरीक्षक सूरज चंदनशिवे यांच्या सांगलीतील निवास्थानावर राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाने शुक्रवारी मध्यरात्री छापे टाकले. दोघांची कसून चौकशी करुन निवास्थानाची तासभर झडती घेण्यात आली. पण हाती काहीच लागले नाही.सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे तत्कालीन निरीक्षक घनवट यांच्या पथकाने गतवर्षी मिरजेतील बेथेलहेमनगर येथील झोपडवजा घरात छापा टाकून सुमारे सव्वातीन कोटीची रोकड जप्त केली होती. याप्रकरणी मैनूद्दीन मुल्ला यास अटक केली होती. चौकशीत त्याने ही रक्कम वारणानगर येथील शिक्षक कॉलनीतून चोरी केल्याची कबूली दिली. घनवटच्या पथकाने वारणानगर येथेही छापा टाकून कोट्यावधीची रोकड जप्त केली होती. या कारवाई दरम्यान घनवट ‘टिम’ने सुमारे सव्वानऊ कोटीची रक्कम परस्पर हडप केल्याचे चार महिन्यापूर्वी उघडकीस आले. त्यानुसार घनवट, चंदनशिवे सातजणांविरुद्ध कोडोली पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे नोंद आहेत. याप्रकरणी कोल्हापूर सीआयडीचे पथक तपास करीत आहे. दोन दिवसापूर्वी घटवट, चंदशिवे सीआयडीला शरण आले. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत. प्रभारी पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड, निरीक्षक स्वाती गायकवाड यांचे पथक घनवट व चंदनशिवेला घेऊन शुक्रवारी मध्यरात्री सांगलीत दाखल झाले. सांगली सीआयडीच्या निरीक्षक गीता बागवडे यांच्या मदतीने पथकाने घटवट व चंदनशिवेच्या निवास्थानावर छापा टाकला. घनवट शंभरफुटी रस्त्यावरील सिद्धीविनायक पूरम संकुलात, चंदनशिवे विश्रामबागच्या वारणालीतील पाचव्या गल्लीत भाड्याने फ्लॅट घेऊन राहत होता. पथकाने दोन्ही ठिकाणी एकाचवेळी छापा टाकून फ्लॅटमध्ये झडती घेतली. परंतु हाती काहीच लागले नाही. पहाटेच्या सुमारास पथक कोल्हापूरला रवाना झाले. पाच जणांच्या मागावरसहाय्यक पोलिस फौजदार शरद कुरळपकर, हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, रवी पाटील हे या प्रकरणातील चौघे अजूनही फरारी आहेत. कुलदीप कांबळे यास तात्पूरता जामीन मिळाला आहे. गेल्या आठवड्यातही सीआयडीचे पथकाने सांगलीत येऊन स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पाच पोलिसांची चौकशी केली होती. त्यांच्याकडे फरारी असलेल्या पोलिसांबाबत चौकशी केली.