शहरं
Join us  
Trending Stories
1
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
2
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
3
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
4
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
6
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
7
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
8
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
9
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
10
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
11
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
12
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
13
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
14
भारताने तुर्कस्तानला धडा शिकवला! चॉकलेट, फळं, कपड्यांपासून ते पर्यटन; 'या' गोष्टी झाल्या बॉयकॉट
15
"आत्महत्या करण्यापूर्वी तिने सूरजला फोन करुन.."; जिया खानच्या मृत्यूनंतर १२ वर्षांनी झरीना वहाब यांचा मोठा खुलासा
16
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
17
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
18
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
19
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
20
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'

सिडकोचा नवा गृहप्रकल्प नव्या वर्षात

By admin | Updated: October 20, 2016 03:07 IST

सिडकोच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी तळोजा येथे १३,८१0 घरांचा नवीन गृहप्रकल्प उभारला जाणार आहे.

नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी तळोजा येथे १३,८१0 घरांचा नवीन गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. साधारण जानेवारी २0१७ पासून या गृहप्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. विशेष म्हणजे सिडकोने अलीकडेच आपल्या विविध प्रकल्पातील शिल्लक घरे विक्रीला काढली आहेत. त्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे नव्या वर्षात येवू घातलेल्या गृहप्रकल्पालाही भरघोस प्रतिसाद मिळेल, असा विश्वास सिडकोला वाटतो आहे.सिडकोने यापूर्वी विविध घटकांसाठी साधारण दीड लाख घरे बांधली आहेत. डिसेंबर २0१९ पर्यंत आणखी ५५ हजार घरे बांधण्याचा निर्धार सिडकोने व्यक्त केला आहे. त्यापैकी खारघर येथे स्वप्नपूर्ती, व्हॅलीशिल्प आणि उलवे येथे या प्रकल्पाअंतर्गत तीन हजार ६00 घरे बांधण्यात आली आहेत. उर्वरित ५१ हजार ४00 घरांची टप्प्याटप्प्याने निर्मिती करण्याचे सिडकोची योजना आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात तळोजा येथे १३,८१0 घरांचा मेगा गृहप्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण २ हजार ५४ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यानुसार या प्रकल्पासाठी निविदासुध्दा मागविण्यात आल्या असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारी २0१७ पासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याची सिडकोची योजना आहे. या प्रकल्पातील घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटांसाठी असणार आहेत. या घरांचे क्षेत्रफळ अनुक्रमे ३0८ चौरस फूट आणि ३७0 चौरस फूट असे असणार आहे.येत्या काळात सर्वसामान्यांना बजेटमधील घरे उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्यानुसार २0१९ पर्यंत ५५ हजार घरे निर्माण करण्याचे उद्दिष्ट सिडकोने बाळगले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी पुढील प्रत्येक वर्षी नवीन गृहप्रकल्प साकारण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार पुढील तीन वर्षात टप्प्याटप्प्याने ३८,३१७ घरांची निर्मिती करण्याची योजना आहे. त्याबाबतचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. ही घरे घणसोली, वाशी, पाचनंद आदी ठिकाणी बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.>शिल्लक घरांनाही मागणीखासगी विकासकांपेक्षा ग्राहकांची सिडकोच्या घरांना नेहमीच प्रथम पसंती राहिली आहे. त्यामुळे सिडकोने एखादा गृहप्रकल्प जाहीर केला की, ग्राहकांच्या त्यावर उड्या पडतात. सध्या सिडकोने आपल्या विविध गृहप्रकल्पांतील ३८0 शिल्लक घरे विक्रीला काढली आहेत. त्यालाही ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. यातच नव्या वर्षात सिडकोचा नवा गृहप्रकल्प येत असल्याने बजेटमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांना घर घेण्याची आणखी एक संधी प्राप्त होणार आहे.