शहरं
Join us  
Trending Stories
1
Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू
2
तेजस्वी मुख्य चेहरा, एक-दोन नव्हे तर एवढे उपमुख्यमंत्री...! बिहारमध्ये महाआघाडीनं तयार केला जागा वाटपाचा असा फॉर्म्यूला
3
बिहार निवडणुकीपूर्वी NDA मध्ये रस्सीखेच; स्वत:ला मोदींचा हनुमान म्हणवणारा नेता का आहे नाराज?
4
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
5
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
6
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
7
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
8
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
9
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
10
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
11
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
12
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
13
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
14
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
15
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
16
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
17
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
18
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
19
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
20
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती

फडणवीस सरकारला सीआयडीचा रेड अ‍ॅलर्ट

By admin | Updated: February 5, 2015 01:38 IST

देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्याचे मूल्यांकन करताना राज्य गुप्तचर विभागाने (सीआयडी) निवडक मंत्री वगळता इतरांच्या कामगिरीबाबत रेड अ‍ॅलर्ट दिला

यदु जोशी - मुंबईदेवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्याचे मूल्यांकन करताना राज्य गुप्तचर विभागाने (सीआयडी) निवडक मंत्री वगळता इतरांच्या कामगिरीबाबत रेड अ‍ॅलर्ट दिला असून मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त करण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. नवीन सरकारला १०० दिवस पूर्ण होत असताना सीआयडीने जनतेला सरकारबद्दल काय वाटते या विषयीचा ‘फीड बॅक रिपोर्ट’ दिला आहे. नवीन सरकारने आणि विशेषत: मुख्यमंत्री फडणवीस यांनी गतिमान आणि पारदर्शक कारभाराच्या संदर्भात तसेच औद्योगिक गुंतवणूक वाढण्याच्या दृष्टीने केलेल्या घोषणांबद्दल लोकांमध्ये चांगली प्रतिक्रिया असल्याचे सूत्रांनी सांगितले. पण या सरकारमधील सर्व मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक आहे असे मात्र नाही. निवडक पाच-सहा मंत्र्यांची खात्यावर चांगली पकड बसली असली तरी अन्य कॅबिनेट मंत्री आणि एखाद-दोन अपवाद वगळता बहुतेक सर्व राज्यमंत्र्यांचा अद्याप जम बसायचा आहे, असे मत गुप्तचर यंत्रणेने नोंदविले आहे. एका ज्येष्ठ मंत्र्याने सीआयडीकडून असा ‘फीड बॅक’ मिळाला असल्याचे मान्य केले. सूत्रांनी असेही सांगितले की, नवीन सरकारच्या घोषणा अतिशय चांगल्या आहेत पण त्यांची अंमलबजावणीही नजीकच्या काळात दिसणे नागरिकांना अपेक्षित आहे. आधीच्या सरकाच्या तुलनेत या सरकारची विश्वासार्हता अधिक दिसते पण अंमलबजावणीच्या पातळीवर साशंकतादेखील बोलून दाखविली गेली. भाजपाचे मंत्री एकत्र बसणारच्राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि बाहेरही काही मंत्री करीत असलेल्या विधानांमुळे बरेचदा गोंधळ निर्माण होतो. भाजपाच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नाही, असे चित्र त्यातून निर्माण होते. एकनाथ खडसेंसारखे ज्येष्ठ मंत्री नाराज असल्याचेही वारंवार समोर येते. या पार्श्वभूमीवर, भाजपाच्या निदान काही ज्येष्ठ मंत्र्यांची मुख्यमंत्री दर आठवड्याला वा नियमितपणे बैठक घेतील आणि वादाच्या मुद्यांवर त्यात चर्चा होईल, अशी शक्यता आहे.