शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिस्ती मिशनरीचा साक्षीदार आंद्रिया चर्च

By admin | Updated: December 22, 2016 23:37 IST

येत्या २५ तारखेला प्रभू येशु ख्रिस्त यांचा जन्मोत्सव अर्थात ख्रिसमस सर्वत्र साजरा होणार आहे.

ऑनलाइन लोकमत/अझहर शेख

नाशिक, दि. 22 - येत्या २५ तारखेला प्रभू येशु ख्रिस्त यांचा जन्मोत्सव अर्थात ख्रिसमस सर्वत्र साजरा होणार आहे. यानिमित्त नाशिकच्या सुमारे १२४ वर्षे जुन्या चर्चच्या इतिहासाचा लोकमत आॅनलाईनच्या वाचकांसाठी घेतलेला हा आढावा. शरणपुररोडवर मिशनरी रेव्हरन्ट विल्यम् प्राईस यांनी १८००  सालात लहानसे प्रार्थनास्थळ चॅपल बांधले. प्रार्थनास्थळ लहान पडू लागल्याने १८९२ साली सुमारे चार एकर जागेत क्रॉसच्या आकारात संपूर्ण काळ्या पाषाणामध्ये संत आंद्रिया चर्च उभारण्यात आले. हे चर्च नाशिक शहरासह जिल्ह्यातील ख्रिस्ती मिशनरी चळवळीचा साक्षीदार आहे. ख्रिस्ती चळवळीला गती मिळाली ती या चर्चपासूनच. शरणपूर रोड परिसरात हे चर्च असून हा भाग ख्रिस्ती मिशनरीचा मुख्य केंद्र राहिले आहे.या चर्चच्या बांधकामाचा खर्च त्याकाळात १९ हजार रूपये इतका आला होता. संपूर्ण दगडी बांधकाम आणि आतील बाजूस लाकडी कलाकुसर हे या चर्चचे वैशिष्ट असून चर्चच्या वास्तूचा आकार हे देखील स्थापत्यकलेचा एक आगळा नमुना आहे. हे चर्च क्रॉसच्या आकारात बांधण्यात आले. चर्चच्या बांधकाम सुमारे २८० दिवसांमध्ये पुर्णत्वास आले. चर्चसाठी लागणारे दगड हे नाशिकमधून उपलब्ध करुन घेण्यात आली. म्हसरुळजवळील चामर लेणी परिसराच्या डोंगरामध्ये खोदकाम करुन तेथून काळे पाषाण आणून चर्चचे बांधकाम करण्यात आले आहे. सदर दगड हे डोेंगरावरूनच घडवून चर्चच्या ठिकाणी आणली गेली व तेथे त्याचे चुना व मातीच्या वापरात बांधकाम करण्यात आले आहे. चर्चची क्षमतादेखील अधिक असून यामध्ये एकाच वेळी २५०हून अधिक समाजबांधव प्रार्थना करू शकतात. सदर चर्च हे नाशिक जिल्ह्यातील पहिले चर्च असल्याची माहिती रेव्हरंन्ट अरुण शिंदे यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे. प्रभू येशू ख्रिस्त यांच जन्मोत्सव अर्थात ख्रिसमस सणाच्या निमित्ताने चर्चमध्ये सजावट, रंगरंगोटी, रोषणाईच्या कामाला वेग आला आहे.