डोंबिवली : ठाकुर्ली-चोळेगाव गावदेवीच्या शनिवारपासून दोन दिवस चालणाऱ्या यात्रेनिमित्त चोळेगाव-एमआयडीसी रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्यासाठी वाहतूक शाखेकडे परवानगी मागितल्याचे गावदेवी मंदिर प्रमुख मधुकर पाटील यांनी सांगितले. रस्ता बंद असल्याने वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन मंदिर व्यवस्थापनाने केले आहे. तसा सूचनाफलकही त्यांनी ठिकठिकाणी लावला आहे. त्यामुळे कल्याण पत्री पूल ते कल्याण-डोंबिवली समांतर रस्त्याने येणाऱ्या वाहनांना गावात जाता येणार नाही. त्यांना म्हसोबा मंदिराजवळ डावीकडे वळून कल्याण-खंबाळपाडा मार्गे डोंबिवलीत घरडा सर्कलकडे जाता येईल. ठाकुर्ली फाटकापासून चोळे एमआयडीसी रोडने खंबाळपाडा आणि कल्याणकडे जाता येणार नाही. त्या वाहनांना हनुमान मंदिर चौकातून समांतर रस्त्याकडे जाता येईल. कोंडी होऊ नये, यासाठी हा बदल केला आहे.
चोळेगाव-एमआयडीसी वाहतूक दोन दिवस बंद
By admin | Updated: May 21, 2016 03:51 IST