शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रपतीपदाची निवड मोदींनी ठरवल्यास बिनविरोध

By admin | Updated: April 25, 2017 02:17 IST

: पुरेसे संख्याबळ नसताना राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी समन्वय ठेवला तर

सोलापूर : पुरेसे संख्याबळ नसताना राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांशी समन्वय ठेवला तर राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकते, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले़संसदीय कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सर्वपक्षीय नागरी समितीच्या वतीने खा. पवार यांचा सोलापुरात नागरी सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांकडून शरद पवार यांचे नाव चर्चिले जात आहे. माकपचे सीताराम येचुरी यांनी तर राष्ट्रपतीपदासाठी पवार हेच योग्य उमेदवार ठरतील, असे म्हटले आहे. याबाबत पत्रकारांनी छेडले असता पवार म्हणाले, देशाच्या दोन्ही सभागृहांत राष्ट्रवादीचे अवघे १४ संख्याबळ असताना मी राष्ट्रपतीपदाचे स्वप्न पाहणे योग्य ठरणार नाही़ दोन्ही सभागृहांत मिळून एनडीएचे संख्याबळ अधिक आहे़ शिवाय, उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर त्यात वाढ झाली आहे़ मोदी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेतल्यास राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकेल. देशात मोदी यांची लाट सुरू आहे़ ही लाट कायम राहणार नाही़, पण मोदी व भाजपासमोर सक्षम विरोधक नसल्यामुळे लोक भाजपाच्या बाजूने मतदान करीत आहेत़ ही परिस्थिती काही दिवसांनी बदलेल, असा दावाही पवार यांनी केला. (प्रतिनिधी)साखर कारखाने पूर्वपदावर आणणार-राज्यात पाण्याअभावी साखर कारखान्यांची परिस्थिती वाईट झाली आहे़ काही कारखाने अडचणीत सापडले आहेत़ राज्यातील साखर कारखाने पूर्वपदावर आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिझर्व्ह बँक व नाबार्ड यांच्यासमवेत बैठक घेऊन कारखाने वाचविण्यासाठी योग्य तो तोडगा काढणार असल्याचेही पवार म्हणाले.उजनीत येणारे घाण पाणी थांबविणार : पुणे शहरातील ड्रेनेजचे घाण पाणी उजनी धरणातील पाण्यात मिसळत आहे़ पालिकेला मलनिस्सारण प्रकल्प उभा करण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यासाठी ४५० कोटी रुपयांची गरज आहे़ केंद्र व राज्य सरकारने मदत केल्यास उजनीत येणारे घाण पाणी थांबविण्यास मदत होईल, असेही पवार यांनी सांगितले़