शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नऊ सभापतींची निवड

By admin | Updated: July 19, 2016 01:46 IST

महानगरपालिकेच्या परिवहन समिती व आठ विशेष समिती सभापतीपदासाठी राजमाता जिजाऊ सभागृहात निवडणुकीचे आयोजन करण्यात आले

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या परिवहन समिती व आठ विशेष समिती सभापतीपदासाठी राजमाता जिजाऊ सभागृहात निवडणुकीचे आयोजन करण्यात आले होते. पीठासन अधिकारी तसेच रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल उगले यांनी नऊ सभापतींची निवड घोषित केली.परिवहन समिती सभापती पदासाठी मोहन म्हात्रे यांची तर महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी सायली शिंदे यांची निवड करण्यात आली. पाणीपुरवठा समिती सभापती पदासाठी निवृत्ती जगताप, क्रीडा व सांस्कृतिक समिती लीलाधर नाईक, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती रमेश डोळे, विधी समिती सभापती पदासाठी गणेश म्हात्रे, विद्यार्थी व युवक कल्याण समिती सभापती पदासाठी सीमा गायकवाड, उद्यान व शहर सुशोभीकरण समिती तनुजा मढवी यांची निवड करण्यात आली. आठ विशेष समित्यांच्या उपसभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत प्रत्येक समितीकरिता एकच उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने आरोग्य परिरक्षण समिती उपसभापती म्हणून उषा पुरु षोत्तम भोईर, महिला व बालकल्याण समिती सुजाता सूरज पाटील, पाणीपुरवठा समिती मोनिका लक्ष्मीकांत पाटील, समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती उपसभापती मुद्रिका मधुकर गवळी, विधी समिती उपसभापती संगीता संदीप म्हात्रे, क्र ीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती उपसभापती, श्रध्दा साजुराम गवस, विद्यार्थी व युवक कल्याण समिती उपसभापती संध्या रामजित यादव, उद्यान व शहर सुशोभीकरण समिती उपसभापती जयश्री एकनाथ ठाकूर यांची बिनविरोध निवड झाल्याचे संबंधित पीठासन अधिकारी म्हणून घोषित केले. नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांना महापौर सुधाकर सोनवणे यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.