शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यापुढे मध्यावधी निवडणुकीचा पर्याय

By admin | Updated: January 28, 2017 23:52 IST

शरद पवार : शिवसेना सरकारमधून बाहेर पडेल

कोल्हापूर : भाजपा-शिवसेना युती तुटल्यामुळे राज्यापुढे मध्यावधी निवडणुकीचा पर्याय असू शकतो, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. युती तुटल्यामुळे शिवसेना आता सरकारमध्ये राहील, असे वाटत नाही आणि राहिलीच तर मात्र, सत्तेसाठी हा पक्ष काहीही करतो असा समज जाईल, असाही चिमटा पवार यांनी घेतला. दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांना युती तुटल्यानंतर राज्यातील सरकार अस्थिर आहे असे आपणास वाटते का, असे विचारल्यावर ते म्हणाले की, सरकार चालविण्याचा भाजपा नक्कीच प्रयत्न करील, पण आम्ही एकत्रित बसून चर्चा करून निर्णय घेऊ. शांतपणे पक्षाच्या शिस्तीत बसेल, अशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल. यासाठी समविचारी पक्षांशीही आम्ही चर्चा करू.भाजपाला राष्ट्रवादी पाठिंबा देणार का, अशी विचारणा केल्यावर ते म्हणाले, आमचा भाजपाला कधीही पाठिंबा राहणार नाही. दोन वर्षांपूर्वी राज्यातील निवडणुका झाल्यानंतर युती होत नसेल, तर आम्ही बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी ठेवली होती. प्रत्यक्षात पाठिंबा दिलेला नव्हता.राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या पक्षांशी आघाडी होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी, ही काही देशाची किंवा राज्याची निवडणूक नाही, त्यामुळे स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पक्षाने दिले आहे. त्याचा पक्षाच्या धोरणांशी काही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. (प्रतिनिधी)निरुपम हा मूर्ख माणूस...भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याचे कॉँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी म्हटल्याचे पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर पवार उसळून म्हणाले, निरुपम हा मूर्ख माणूस आहे. या माणसाचे राज्यासाठी योगदान काय आहे? त्यांनी मुंबईला आणि कोल्हापूरला काय दिले? त्यांचा राज्याच्या राजकारणाशी कसलाही संबंध नाही. पदावरून गेल्यावर यांना कोणी ओळखतही नाही.राष्ट्रपतीपदाबाबत अपेक्षा गैर...शरद पवार राष्ट्रपती होणार अशी चर्चा नेहमी सुरू असते. याबाबत छेडले असता, पवार यांनी चर्चेत तारतम्य बाळगण्याची आवश्यकता बोलून दाखविली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारा खासदार आहेत. पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे भलतीच अपेक्षा करणे अयोग्य आहे. आपले पाय जमिनीवर असले पाहिजेत. अशा प्रकारची अपेक्षा करणे चुकीचे आहे, असे सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकला.