शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

पुणेकरांकडून हिरव्या-निळ्या रंगाला पसंती

By admin | Updated: November 3, 2016 00:29 IST

बससाठी पुणेकरांनी हिरव्या व निळ्या रंगासह त्यावर रंगीबेरंगी पाने-फुले असलेल्या रंगसंगतीला पसंती दिली आहे.

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या बससाठी पुणेकरांनी हिरव्या व निळ्या रंगासह त्यावर रंगीबेरंगी पाने-फुले असलेल्या रंगसंगतीला पसंती दिली आहे. पीएमपीचे संचालक मंडळ व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर या रंगसंगतीवर शिक्कामोर्तब होईल. पुणे महापालिका, पिंपरी- चिंचवड महापालिका व पीएमपीने एकत्रितपणे तब्बल १५५० बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी ५५० बस या एसी व अत्याधुनिक असणार आहेत, तर २०० बस या साध्या ३४ सीटच्या असतील, तर ८०० बस साध्या; परंतु मोठ्या आकाराच्या असणार आहेत. एकूण २०० बसपैकी १२० बस पुणे महापालिका, तर ८० बस पिंपरी-चिंंचवड महापालिका खरेदी करणार आहे. पीएमपीकडून कर्जाद्वारे ८०० बसची खरेदी केली जाणार आहे. तर ५५० बस या असोसिएशन आॅफ स्टेट रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंग (एएसआरटीयू) या दिल्लीस्थित संस्थेकडून भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार आहेत. सध्या पीएमपीच्या ताफ्यात लाल रंगाच्या बस आहेत, तर ‘जेएनएनयूआरएम’ अंतर्गत मिळालेल्या बसचा रंग पांढरा-गुलाबी असा आहे. ताफ्यात नव्याने येणाऱ्या बससाठी यापेक्षा वेगळा रंग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तीन रंगसंगतीचे पर्याय तयार करण्यात आले होते. रेनबो इंद्रधनुष्य बस म्हणजे, बीआरटी मार्ग आणि रेनबो इंद्रधनुष्य लिंक बस म्हणजे, बीआरटी वगळता इतर मार्गांवर धावणाऱ्या बससाठीही ही रंगसंगती वेगळी ठेवण्यात आली. या पर्यायांवर पुणेकरांकडून मतदान घेण्यात आले. दि. ५ ते १२ आॅक्टोबर या कालावधीत एका टोल फ्री क्रमांकावर पर्यायानुसार ‘मिस कॉल’ देण्याचे आवाहन पुणेकरांना करण्यात आले होते. त्यानुसार या कालावधीत पुणेकरांनी दुसऱ्या पर्यायाला अधिक पसंती दिली आहे. बीआरटी मार्गासाठी हिरवा व इतर मार्गांसाठी निळा रंग दुसऱ्या पर्यायात देण्यात आला होता. त्यानुसार या पर्यायाची रंगसंगती असलेल्या बस शहरातील रस्त्यांवर धावण्याची शक्यता आहे.।पुणेकरांनी दुसऱ्या क्रमांकाच्या पर्यायाला अधिक पसंती दिली आहे. त्यानुसार ही रंगसंगतीला पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता घेतली जाईल. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालय व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी पाठविली जाईल. प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतर, ही रंगसंगती बससाठी अंतिम केली जाईल.- डी. पी. मोरे, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपी