कोल्हापूर : येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अनुजा पाटील हिची १४ ते १८ जूनअखेर म्हैसूर येथे होणाऱ्या चॅलेंजर ट्रॉफीसाठी खुल्या भारतीय ब्लू महिला क्रिकेट संघात निवड झाली. या स्पर्धेतून न्यूझीलंड दौऱ्यावर जाणारा संघ निवडला जाणार आहे.चॅलेंजर स्पर्धेसाठी अनुजाची सलग चौथ्या वर्षी निवड झाली आहे. यापूर्वी २०११-१२ साली भारतीय ग्रीन, २०१२-१३ व २०१३-१४ साली रेड संघात तिची निवड झाली आहे. सलग चार वर्षे चॅलेंजर स्पर्धा खेळणारी ती कोल्हापुरातील एकमेव महिला खेळाडू आहे. तिला जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर, माजी अध्यक्ष ऋतुराज पाटील, सचिव रमेश कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
चॅलेंजर ट्रॉफीसाठी अनुजाची निवड
By admin | Updated: June 9, 2015 00:13 IST