शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांना सीडी व डीव्हीडींचा पर्याय

By admin | Updated: July 5, 2015 02:15 IST

दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तकांऐजवी सीडी व डीव्हीडी देता येतील, असे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य शासनातर्फे नेमण्यात आलेल्या समितीने सुचवले आहे.

मुंबई : दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तकांऐजवी सीडी व डीव्हीडी देता येतील, असे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य शासनातर्फे नेमण्यात आलेल्या समितीने सुचवले आहे. ही शिफारस सरकारने मान्य केल्यास विद्यार्थ्यांच्या पाठीवरील बहुतांश भार कमी होऊ शकेल. त्यामुळे सरकार ही शिफारस मान्य करणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.या समितीने सरकारला ४४ शिफारशी केल्या आहेत. या शिफारशी अंमलात कधी येतील, हे अजून निश्चित नाही. पण विद्यार्थ्यांवर या ओझ्यांचा किती घातक परिणाम होतो आहे, याचे धक्कादायक वास्तव समितीने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. कारण ओझ्यामुळे विद्यार्थ्यांना पाठदुखी, मानासिक ताण येणे, स्नायू आखडणे, मणक्याची झीज यांसारखे आजार जडण्याची शक्यता असते. ग्रामीण भागात दप्तराचे ओझे कमी असते, तर शहरी भागांत दप्तराचे ओझे जास्त असते. तेव्हा सरकार किती गंभीरतेने व तत्परतेने या शिफारशींची अंमलबजावणी करणार, हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे. समितीच्या शिफारशी१) प्रत्येक विषयासाठी दोन किंवा तीन महिन्यांच्या शैक्षणिक सत्रनिहाय (टर्मनुसार) पुस्तकाची निर्मिती करावी. २) आॅल इन वन समृद्ध पुस्तक : तीन महिन्यांसाठी एकच पुस्तक तयार करावे. ३) एक विद्यार्थी-एक पुस्तक या धोरणाप्रमाणे दोन महिन्यांना एक पुस्तक याप्रमाणे पुस्तके तयार करावीत. ४) प्रत्येक विषयाचा महत्त्वपूर्ण व अपेक्षित आशय कौशल्य विकसित करण्यावर भर द्यावा़ ५) शैक्षणिक सत्रनिहाय विषय गटाची एकत्रित स्वाध्याय गृहपाठ पुस्तिका तयार करावी. ६) बालभारतीने पुस्तक छपाईसाठी हलका कागद वापरावा. ७) पुस्तकांऐवजी आॅडिओ, व्हीडिओ स्वरूपात सीडी डीव्हीडी स्वरूपात देता येईल. ८) शाळेत ई-लर्निंगचा वापर वाढवावा. ९) ‘ई-लर्निंग-गुरुजी डॉट कॉम’सारख्या शैक्षणिक वेबसाइट व साहित्याचा उपयोग करता येईल. १०) प्रत्येक विषयाला वर्गपाठ व गृहपाठासाठी दोन किंवा जास्त विषयाला एकच वही करावी. वह्यांच्या आकार लहान ठेवावा. ११) प्रथमसत्र आणि द्वितीय सत्रासाठी वह्या वेगवेगळ््या ठेवाव्यात. १२) ८० पानांपेक्षा अधिक मोठ्या व जाड कव्हर असलेल्या वह्यांच्या वापरावर बंदी घालवी. १३) विषयनिहाय फक्त एकच स्वाध्याय पुस्तिका तयार करावी. त्यामध्ये गृहपाठ व स्वाध्याय एकत्रित असावेत. १४) विषयनिहाय गृहपाठांच्या साप्ताहिक वेळापत्रकानुसार पुस्तके व वह्या दप्तरात असाव्यात. १५) विषयनिहाय तासिकांचा कालावधी वाढवून तासिकानुसारच पुस्तके व वह्या यांची संख्या असावी. १६) वह्याऐवजी पाटीचा वापर अधिक करावा. १७) वह्यांऐवजी वर्कशीटचा वापर करावा. १८) वर्गात भिंतीलगत तळफळ््यांची योजना केल्यास विद्यार्र्थी त्यावर लेखनाचा सराव करू शकतील. १९) प्रत्येक विषयाला वर्गपाठाला व गृहपाठाला स्वतंत्र वह्या न करता दोन किंवा जास्त विषयाला एकच वही करावी. २०) दररोज वेळापत्रकामध्ये जोड तासिका ठेवाव्यात़ २१) प्रत्येक दोन विषयाला एक १०० पानी वही कच्च्या नोंदीसाठी असेल. २२) पहिल्या सत्रासाठी एक वही व दुसऱ्या सत्रासाठी नवीन दुसरी वही म्हणजे २०० पानी एकच वही वर्षभरासाठी नसावी. २३) अ) भाषाविषयक गटाचे मिळून एक, ब) गणित व भूमिती व विज्ञान यांचे मिळून एक व क) समाजशास्त्र व इतर विषयांचे मिळून एक अशा तीन पुस्तकांची एकत्रित बांधणी करावी. २४) स्वाध्याय/गृहपाठ शालेय वेळेत करून घ्यावा. २५) भाषा विषयाचीच पुस्तके दप्तरात असली पाहिजेत. इतर विषयांची पुस्तके शाळेत आणण्याची आवश्यकता नाही. २६) कोणत्याही विषयाचे गाइड, अ‍ॅक्टिव्हिटी बुक, वर्कबुक, प्रॅक्टिसबुक, शाळेत/वर्गात आणण्यास बंदी करावी. २७) शासनाने दिलेली नवी पाठ्यपुस्तके शाळेमध्ये ठेवावीत व जुनी पुस्तके घरामध्ये स्वयंअध्ययनासाठी द्यावीत. २८) सीबीएसई, आयसीएसई, आयबी शाळांमध्ये एका विषयासाठी शाळांमधील मुख्याध्यापकांनी एकच पुस्तक निवडावे, ज्यामध्ये सर्व माहिती असेल. २९) पाठ्यपुस्तके व इतर साहित्य विद्यार्थ्यांनी आपापसात शेअर करून घेण्यास सांगावे. ३०) आवश्यक तेवढे एखादे पुस्तक, वही घरी नेता येईल. ३१) शब्दकोष, एनसायक्लोपिडिया व अशा स्वरूपाचे संदर्भग्रंथ शाळेतच ठेवावेत व मुलांना वेळोवेळी उपलब्ध करून द्यावेत. ३२) वजनाने हलक्या पॉलीमर बॅगा वापराव्यात़ ३३) गृहपाठ शाळेतच करण्याची व्यवस्था नियोजनपूर्वक करता येईल. घरी चरित्रात्मक पुस्तके वाचन व प्रत्यक्ष कृतीद्वारे आधारित तसेच संशोधनदृष्टी व कल्पकदृष्टी वाढवणारे अभ्यासप्रकल्प करून घ्यावेत, जेणेकरून शाळा सुटल्यावर मुले आनंदाने घरी जाऊ शकतील. ३४)कृतियुक्त शिक्षणावर भर द्यावा. ३५) क्रीडा साहित्य शाळेतच ठेवण्याची व्यवस्था करावी किंवा शाळेने साहित्य उपलब्ध करून द्यावे. ३६) स्वच्छ पिण्याचे पाणी शाळेतच उपलब्ध करावे. (फिल्टर) बसवावेत, त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या बाटलीचे ओझे कमी होईल. ३७) बाकांची रचना विद्यार्थी दप्तर (वह्या +पुस्तके ) ठेवता येईल. ३८) शाळेत ग्रंथालयासारखे ‘दप्तरालय’ सुरू करावे. ३९) जुनं ते सोनं/डबल दप्तर योजना : जुन्या पुस्तकांचा संच शाळेत आपापल्या जागेवर, बेंचवर ठेवावेत व नव्या पुस्तकाचा संच घरातच अभ्यासासाठी ठेवायचा आहे. ४०) अधूनमधून शिक्षकांनी विद्यार्थ्यांची दप्तर तपासणी करावी व अनावश्यक बाबी आणू नये, असे सांगावे. ४१) डीएड/बीएड अभ्यासक्रमामध्ये दप्तराचे ओझे कमी करण्याबाबतचा समावेश करावा. ४२) मुख्याध्यापकांनी पालकांशी बोलून विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणीपासून परावृत्त करावे किंवा घराजवळ शिकवणी लावण्यास सांगावे. ४३) वेळापत्रकानुसार बॅग कशी भरावी, याचे प्रशिक्षण शाळेने द्यावे. ४४) विद्यार्थ्यांनी अधिक वह्या, पुस्तके शाळेत आणू नयेत म्हणून विद्यार्थी व पालक यांचे समुपदेशन करावे.समितीला काय आढळले ?१० वर्षांपेक्षा लहान असणाऱ्या 58%मुलांमध्ये मध्यम स्वरूपाचा स्थायू दुखीचा त्रास आढळला.बारा वर्षांखालील 70-75मुलांना ओझ्यामुळे उद्भवणाऱ्या त्रासामुळे आजार जडल्याचे दिसले.जड दप्तर घेऊन जाणाऱ्या मुलांना कायम वाकून चालल्यामुळे मान व पाठदुखीचा त्रास होतो.ओझ्यामुळे मुलांच्या फुप्फुसांची कार्यक्षमता कमी झालेली आढळली. मुलांच्या खांद्यावरील ओझ्यामुळे सांधे आखडतात.