शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

स्वीकृत सदस्यांची निवड भाजपाने ढकलली पुढे

By admin | Updated: April 5, 2017 00:40 IST

भारतीय जनता पार्टीने महापालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड पुढे ढकलली आहे. २० एप्रिलला ही निवड होईल.

पुणे : पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे इच्छुकांच्या संख्येत वाढ लागल्याने भारतीय जनता पार्टीने महापालिकेतील स्वीकृत सदस्यांची निवड पुढे ढकलली आहे. २० एप्रिलला ही निवड होईल. चुरस वाढल्यामुळे तसेच मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करायचे, की राजकीय सोय पाहायची याचाही निर्णय होत नसल्याने पक्षश्रेष्ठींचा सल्ला घेण्याचे ठरले असल्याचे समजते.महापालिकेत भाजपाकडे ९८ सदस्यांचे बळ आहे. एकूण नगरसेवक संख्या १६२ आहे. ५ सदस्य स्वीकृत म्हणून निवडता येतात. १६२ भागीले ५ याप्रमाणे प्रत्येकी ३२ नगरसेवकांमागे एक स्वीकृत सदस्य याप्रमाणे ५ नगरसेवक निवडता येतील. भाजपाच्या वाट्याला ३ नगरसेवक येतात. राष्ट्रवादी काँग्रेसकडून १ व शिवसेना किंवा भाजपा यांची सदस्यसंख्या सारखी (प्रत्येकी १०) असल्यामुळे दोघांपैकी एका पक्षाला (याची निवड चिठ्ठी काढून केली जाणार आहे.) १ सदस्य याप्रमाणे ५ जागा आहेत. या पदांवर डॉक्टर, वकील, प्राध्यापक, अभियंते अशा एखाद्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचीच निवड करावी, असा नियम सरकारने केला आहे. त्याचा दाखला देत काही स्वयंसेवी संस्था, संघटनांनी भाजपा तसेच अन्य राजकीय पक्षांवरही अशाच व्यक्तींचीच निवड करावी, असा आग्रह धरला आहे. तशी लेखी मागणीच त्यांनी या पक्षांच्या प्रमुखांकडे केली आहे. सदस्य संख्येमुळे सर्वाधिक स्वीकृत सदस्य मिळणाऱ्या भाजपावर त्याचाही दबाव आला आहे.दरम्यान या पदासाठी भाजपाकडून प्रमोद कोंढरे, जगन्नाथ कुलकर्णी, उज्ज्वल केसकर, गोपाळ चिंतल, गणेश घोष तसेच पक्षसंघटनेत गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या अन्य काही निष्ठावान कार्यकर्त्यांची नावे घेतली जात आहेत. निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले माजी सभागृह नेते गणेश बीडकर यांचेही नाव आहे. मात्र काही जणांनी पराभूतांना संधी का द्यायची, असा सवाल करीत त्यांना विरोध केला असल्याची चर्चा आहे.राष्ट्रवादी काँग्रेसला एकच जागा मिळणार असली तरी त्यासाठीही बरीच नावे आहेत. महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, निवडणुकीत पराभव झालेले माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांची नावे त्यात आघाडीवर आहे. राष्ट्रवादीचा निर्णयही पक्षश्रेष्ठी स्तरावरच होण्याची शक्यता आहे. शिवसेना व काँग्रेस यांच्यापैकी एकालाच संधी मिळणार आहे. ती आपल्यालाच मिळावी, यासाठी काँग्रेसने एमआयएमच्या एकमेव नगरसेविकेबरोबर हातमिळवणी करीत संख्या वाढवून घेण्याचा प्रयत्न चालवला होता, मात्र त्याला यश मिळाले नाही. त्यामुळे चिठ्ठीनेच हा निर्णय होईल.(प्रतिनिधी)>निवडीचे अधिकार पक्षश्रेष्ठींनापिंपरी-चिंचवड महापालिकेतही भाजपाने असाच स्वीकृत सदस्यांची निवड पुढे ढकलून २० एप्रिल रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित करण्याचे अधिकार पक्षश्रेष्ठींनाच देण्यात येतील, असे दिसते आहे. स्थानिक स्तरावर नेत्यांनी आपापल्या समर्थकांची नावे पुढे केल्यामुळे वाद होऊ नयेत, यासाठी भाजपाकडून सावधगिरी बाळगली जात आहे. त्यातच स्वयंसेवी संस्थांनी सरकारने नियम केला, मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली, त्याप्रमाणेच निवड करावी असा दबाव टाकला आहे.