शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

‘चित्रभूषण’ रामनाथ जठारांच्या पत्नीची उतारवयात आबाळ ! मानधनासाठी धडपड : अवघ्या तीन फुटांच्या जागेत संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 01:03 IST

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संकलक व ध्वनिमुद्रक रामनाथ जठार यांच्या इंदिरा या ८८ वर्षांच्या वयोवृद्ध पत्नी विपन्नावस्थेत जीवन कंठत आहेत. तीन फुटांच्या अरुंद, चिंचोळ्या जागेत आपल्या आयुष्याला ठिगळांची जोड देत, दोनवेळच्या जेवणापासून ते अगदी लहानसहान गरजा पूर्ण करण्याइतकीही त्यांची परिस्थिती

ठळक मुद्देआपल्या अखेरच्या दिवसांत सुरू असलेली जगण्याची लढाई थोडी सुकर व्हावी, यासाठी झटताहेत.

इंदुमती गणेश ।कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ संकलक व ध्वनिमुद्रक रामनाथ जठार यांच्या इंदिरा या ८८ वर्षांच्या वयोवृद्ध पत्नी विपन्नावस्थेत जीवन कंठत आहेत. तीन फुटांच्या अरुंद, चिंचोळ्या जागेत आपल्या आयुष्याला ठिगळांची जोड देत, दोनवेळच्या जेवणापासून ते अगदी लहानसहान गरजा पूर्ण करण्याइतकीही त्यांची परिस्थिती नाही. झगमगत्या सिनेसृष्टीच्या पडद्यामागचा अंधार, त्यांच्यानंतर कुटुंबीयांच्या अवस्थेचे भयाण वास्तव यानिमित्ताने पुढे आले आहे.

रामनाथ जठार यांनी १९४१ ला ‘हंस पिक्चर्स’मध्ये लाईटबॉय म्हणून कामाला सुरुवात केली आणि १९४६ साली भालजी पेंढारकर यांच्या ‘प्रभाकर पिक्चर्स’मध्ये प्रवेश केला. सलग ४० वर्षे त्यांनी भालजींशी एकनिष्ठ राहून चित्रपटांचे ध्वनिमुद्रण केले, ते ध्वनिलेखक झाले. चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविले गेले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळानेही २००८ साली त्यांना ‘चित्रभूषण’ पुरस्कार प्रदान केला होता. अशा या मोठ्या कलावंताचे वयाच्या ९८ व्या वर्षी फेब्रुवारी २०१६ मध्ये निधन झाले. रामनाथ जठार हे जुना बुधवार पेठेतील डांगे गल्लीत राहत होते. त्यांना वृद्ध कलाकार म्हणून १५०० रुपये मानधन मिळत होते. त्यांच्या निधनानंतर वयोवृद्ध इंंदिरा यांचे हाल सुरू झाले.

कशाबशा तीन फुटांच्या जागेत त्या स्वत:चे जेवण करून खातात. स्वत:ची सगळी कामं करतात. वृद्ध कलाकाराचे वारसदार म्हणून इंदिरा यांचे नाव लागले नाही; त्यामुळे मुलीने प्रयत्न करून शासनाकडे सगळा प्रस्ताव पाठवला; त्याला मंजुरीही मिळाली, तरी हातात रक्कम पडेना. गेल्या दीड वर्षात जिल्हा परिषदेने या प्रकरणात टोलवाटोलवी केली.अखेर काही दिवसांपूर्वी शासनाकडून वारसदार म्हणून नाव लागल्याचे पत्र मिळाले; पण रक्कम खात्यावर आलीच नाही. त्यावर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी खाते क्रमांक चुकीचा पडला आहे, असे कारण पुढे केले. पतीनंतर या मानधनासाठी अजूनही वृद्ध इंदिरा यांची धडपड सुरू आहे. आपल्या अखेरच्या दिवसांत सुरू असलेली जगण्याची लढाई थोडी सुकर व्हावी, यासाठी झटताहेत.चित्रपटांचा ठेवा अडगळीतरामनाथ जठार यांनी आपल्या कारकिर्दीत जवळपास ७० ते ८० चित्रपट केले. त्या सर्व चित्रपटांचा इतिहास त्यांनी कृष्णधवल छायाचित्रे, पुरस्कार, सन्मानपत्रांच्यारूपाने जपला होता. त्यांच्या निधनानंतर मात्र स्वत:च्याच जगण्याची हेळसांड सहन करीत असलेल्या इंदिरा यांना हा अमूल्य ठेवा जपणे शक्य झालेले नाही. त्यामुळे हा ठेवा आता अडगळीत पडला आहे, तर काही नष्टच झाला आहे. या आजींना मानधन देण्यासाठी व चित्रपटांचा इतिहास जतन करण्यासाठी चित्रपट महामंडळाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

यशवंत भालकर यांचे अखेरचे प्रयत्नशासनदरबारी दादच लागत नसल्याचे बघून इंदिरा आज्जींनी पंधरा दिवसांपूर्वी दिग्दर्शक यशवंत भालकर यांची भेट घेऊन आपली परिस्थिती सांगितली. त्यांना भालकर यांनी ‘तुमचं काम करून देणारच,’ असा शब्द दिला. महापौर सरिता मोरे यांची निवड झाल्यानंतर त्यांचे अभिनंदन करण्यासाठी गेल्यानंतर त्यांनी इंदिरा आजींची परिस्थिती पाहिली आणि मंगळवारी सायंकाळी आमदार राजेश क्षीरसागर यांना लेखी निवेदन देऊन त्यांना अर्थसाहाय्य मिळावे, अशी विनंती केली. आमदारांनीही सकारात्मक निर्णय घेऊ, असा प्रतिसाद दिला; पण बुधवारी बातमी आली ती भालकर यांच्याच निधनाची. क्षीरसागर यांनी या आठवणींना स्मशानभूमीत उजाळा दिला.