शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

चित्रा वाघ यांच्या संस्थेची एसीबीमार्फत चौकशी करा

By admin | Updated: January 3, 2016 02:35 IST

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या दीक्षा सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष असून, या संस्थेला मुंबई, ठाणे परिसरातील शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरवठ्याचे कंत्राट

- यदु जोशी,  मुंबईराष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ या दीक्षा सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष असून, या संस्थेला मुंबई, ठाणे परिसरातील शासकीय रुग्णालयांना अन्नधान्य पुरवठ्याचे कंत्राट देण्यात झालेल्या घोटाळ्यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (एसीबी) करावी, अशी शिफारस सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी राज्य कर्मचारी आरोग्य विमा योजनेचे आयुक्त जे.पी.गुप्ता यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय समितीने चौकशी केली असून, या संस्थेला २०१०पासून अलीकडेपर्यंत निविदेविनाच अन्नधान्य पुरवठ्याचे कंत्राट देण्यात आल्याचा ठपका या समितीने ठेवला होता. ‘लोकमत’ने हा अहवाल फोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरोग्यमंत्री सावंत यांनी नागपूर अधिवेशनात विधानसभेत हा अहवाल सादर केला होता. सूत्रांनी सांगितले की, हा अहवाल मांडू नये आणि त्यानंतर त्यावर कारवाईदेखील करू नये, असा दबाव डॉ. सावंत यांच्यावर काही जणांकडून आला होता. मात्र, तो झुगारून त्यांनी अहवाल केवळ मांडलाच नाही, तर अहवालातील निष्कर्षांची चौकशी एसीबीमार्फत करावी, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.दीक्षा सामाजिक संस्थेला निविदा न काढता कंत्राट देण्याऐवजी निविदा काढून कंत्राट दिले असते, तर चांगल्या प्रतीचे व कमी किमतीमध्ये अन्नधान्य मिळाले असते आणि शासनाच्या पैशात बचत झाली असती, असे चौकशी अहवालात म्हटले होते. आरोग्यमंत्र्यांनी एसीबी चौकशीची मागणी केली असताना, आता त्यावर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेतात, या बाबत उत्सुकता आहे. चव्हाण यांची संदिग्ध भूमिका सार्वजनिक आरोग्य विभागातील कार्यासन अधिकारी सुहास चव्हाण यांनी अन्नधान्य पुरवठ्याचे २००९ पासूनचे जीआर काढले. विनानिविदा एकाच एक संस्थेला कंत्राट मिळावेत, या दृष्टीने हे जीआर काढल्याचे दिसते. असे असताना चव्हाण यांच्यावर आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत कुठलीही कारवाई करीत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. अद्यापही पुरवठा सुरूच धक्कादायक म्हणजे, दीक्षा सामाजिक संस्थेच्या अन्नधान्य पुरवठ्याचा अहवाल विधानसभेत सादर झाला. चौकशी समितीने एकूणच प्रक्रियेवर ताशेरेही ओढले. तरीही या संस्थेमार्फत रुग्णालयांना अन्नधान्याचा पुरवठा अद्याप सुरूच असल्याची खात्रीलायक माहिती आहे.