अलिबाग : चिपळूणहून कल्याणकडे जाणारी एसटी बस मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूर-महाड दरम्यान दिवील गावाजवळच्या तीव्र वळणावर उलटली. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात सात प्रवासी जखमी झाले. यामुळे गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल दीड तास ठप्प झाली. बसमधील जखमींना प्रथम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये व नंतर महाड येथील ग्रामीण रु ग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. चालक संजय बाबूराव आहेरकर, वाहक अशोक गोळवे यांच्यासह प्रवासी देवेंद्र लेले, संस्कृती कदम,अनू देवेंद्र लेले (सर्व रा.डोंबिवली), अर्जुन काताळे, सुवर्णा जाधव (दोघेही रा.कल्याण) हे सात जण जखमी झाले.
चिपळूण-कल्याण एसटी बस उलटली
By admin | Updated: June 4, 2015 04:18 IST