शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चिंतन उपाध्यायची जामिनावर सुटका नाही

By admin | Updated: February 3, 2017 01:11 IST

पत्नी व तिचा वकील, अशी दुहेरी हत्या करणाऱ्या चिंतन उपाध्यायविरुद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत, असे निरीक्षण नोंदवत गुरुवारी उच्च न्यायालयाने

मुंबई : पत्नी व तिचा वकील, अशी दुहेरी हत्या करणाऱ्या चिंतन उपाध्यायविरुद्ध पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत, असे निरीक्षण नोंदवत गुरुवारी उच्च न्यायालयाने चिंतन उपाध्यायची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. ‘चिंतनविरुद्ध तपास यंत्रणेकडे पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. त्याने हेमाविषयी आकस बाळगला होता आणि त्याने तिला हटवण्याबाबत डायरीमध्ये नमूद केले आहे. घटस्फोट अर्ज प्रलंबित असताना व घटस्फोट झाल्यानंतरही चिंतन हेमाबरोबर फ्लॅटमध्ये राहिला नाही. मात्र तिची हत्या होण्याच्या काही दिवस आधी तो तिच्याबरोबर फ्लॅटमध्ये राहिला आणि घटनेनंतर निघून गेला,’ असे न्या. साधना जाधव यांनी म्हटले.‘अर्जदाराची (चिंतन) वर्तणूक पाहून त्याला आता जामीन मंजूर करणे योग्य नाही, असे न्यायालयाला वाटते,’ असे न्या. जाधव यांनी म्हटले.तसेच न्या. जाधव यांनी या हत्या प्रकरणातील फरारी आरोपी विद्याधर राजभर याला अटक करण्यासाठी पावले उचलण्याचे निर्देश दिले. ‘तुम्ही (पोलीस) लूक आऊट नोटीस का जारी करत नाही? तुम्हाला प्रत्येक गोष्ट का सांगावी लागते? प्रत्येक वेळी न्यायालयाने आदेश दिल्यानंतरच तुम्ही कारवाई करणार का?’ असे न्यायालयाने संतप्त होत म्हटले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चिंतनने जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला. आपल्याला नाहक या केसमध्ये गोवण्यात आले आहे, असे चिंतनने जामीन अर्जात म्हटले आहे. चिंतनचे वकील राजा ठाकरे यांनी सर्व आरोप फेटाळले. ‘चिंतनने स्वत:हून घटस्फोटासाठी अर्ज केला. त्याला घटस्फोट मिळालाही. कुटुंब न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्याने हेमाला फ्लॅटचे १६ लाख रुपयेही तातडीने दिले. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे हेमाला दरमहा ४० हजार रुपये पोटगी म्हणून देण्याचेही मान्य केले. त्यामुळे हेमाला मारण्यामागे वैवाहिक कलह हाच उद्देश असला पाहिजे, हा पोलिसांचा तर्क निरर्थक आहे. चिंतनने सर्व मान्य केले, त्यामुळे कलह होण्याचा प्रश्नच नाही. त्याशिवाय घटनेच्या काही दिवस आधी तो हेमाबरोबर राहिला. परंतु, ते दोघेही वेगवेगळ्या बेडरूममध्ये राहात होते. या दरम्यान त्या दोघांमध्ये वाद झाल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले नाही,’ असा युक्तिवाद अ‍ॅड. ठाकरे यांनी केला. अशा केसमध्ये आरोपीचा उद्देश पाहिला जाऊ शकत नाही, असे म्हणत न्या. जाधव यांनी चिंतनची जामिनावर सुटका करण्यास नकार दिला. (प्रतिनिधी) हरेश भंबानीच्या मुलीचा अर्जहेमा व तिचा वकील हरेश भंबानी यांची हत्या ११ डिसेंबर २०१५ रोजी करण्यात आली. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे एका कार्डबॉक्समध्ये भरण्यात आले. हे बॉक्स कांदिवली येथे सापडले. पोलिसांना चिंतनचा संशय आल्याने त्याला अटक केली. त्याच्याबरोबर प्रदीप राजभर, आझाद राजभर आणि शिवकुमार राजभर यांनाही अटक करण्यात आली. चिंतनच्या जामिनाला विरोध करण्यासाठी भंबानीची मुलगी अनिता हिने उच्च न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केला होता.