शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

चिंचवडकर ठरणार निर्णायक

By admin | Updated: October 6, 2016 19:03 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीची प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी जाहिर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रभाग रचनेचा आराखडा भाजपा आणि राष्ट्रवादीच्या वर्तुळात फुटला आहे.

ऑनलाइन लोकमत

पिंपरी, दि. 06 -  पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीची प्रारूप प्रभाग रचना शुक्रवारी जाहिर होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच प्रभाग रचनेचा आराखडा भाजपा आणि राष्ट्रवादीच्या वर्तुळात फुटला आहे. आराखडा जाहिर होण्यापूर्वीच या पक्षांनी आपले संभाव्य उमेदवार निवडण्याची तयारी सुरू केली आहे. लोकमतला मिळालेल्या संभाव्य आराखड्यावर शुक्रवारी शिक्कामोर्तब होणार आहे. आराखडा जाहिर होण्यापूर्वी दोन्ही पक्षाचे नेते आणि इच्छुक कामाला लागले आहेत. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ ला होणार आहे. निवडणूक २०११च्या जनगणनेनुसार होणार आहे. त्या वेळी १७ लाख, २७ हजार, ६९२ लोकसंख्या होती. त्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या २ लाख ७३ हजार ८१० असून, अनुसूचित जमातींची लोकसंख्या ३६ हजार ५३५ आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणे टाकण्यात आली आहे. बहुसदस्यीय प्रभाग प्रद्धतीनुसार ही निवडणूक होणार आहे. १२८ वॉर्डांपैकी प्रत्येक प्रभागात ४ असे ३२ प्रभाग असणार आहेत. प्रारूप आराखडा शुक्रवारी सकाळी जाहिर केला जाणार असून आरक्षण सोडतही जाहिर होणार आहे. ३२ प्रभागांसाठी १२८ जागांसाठी सोडत काढण्यात येणार असून, त्यात सर्वसाधारण गटाच्या ७०, ओबीसी ३५, अनुसूचित जातीसाठी २०, अनुसूचित जमातींसाठी ३ जागांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. याविषयीची रंगीत तालीम झाली असून निवडणूक विभाग सोडतीसाठी सज्ज झाला आहे.प्रत्येक प्रभागात एक जागा ही ओबीसीसाठी आरक्षित असून ३२ आणि अनुसुचित जाती आणि जमातींसाठीचे २३ अशी आरक्षणे लोकमतने सर्वप्रथम प्रकाशित केली होती. ५५ जागांची संभाव्य आरक्षणे लोकमतने प्रकाशित केली होती. उर्वरित आरक्षणे ड्रॉ द्वारे काढण्यात येणार आहेत. प्रारूप रचनेत हस्तक्षेप झाल्याचे वृत्त सर्वप्रथम लोकमतने प्रकाशित केले होते. त्यानंतर आरक्षणे सर्वप्रथम जाहिर केल्याने महापालिका प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यावरून सत्ताधाऱ्यांनी प्रभाग रचनेत हस्तक्षेप केल्याचे सिद्ध होते.

प्रभागनिहाय सदस्य संख्या पुढीलप्रमाणे... अनुसूचित जातीअनुसूचित जमातीनागरिकांचा मागासवर्गसर्वसाधारणएकूणसर्वसाधारण१००११७३६६४महिला१००२१८३४६४एकूण२००३३५७०१२८प्रभाग, आरक्षण, समाविष्ठ परिसराची माहिती लोकमतला मिळाली होती. या आराखडयावर शुक्रवारी शिक्कामोर्तेब होणार आहे. हे प्रभाग १, अ,ब,क,ड यानुसार असणार आहेत. हा आराखडा त्रिसदस्सीय समितीस सादर केल्यानंतर दहा प्रभागात बदल सूचविले होते. तसेच निवडणूक आयोगाने त्यात कितपत बदल केले आहेत. हे शुक्रवारी समजणार आहे. प्रभाग १ : आरक्षण १ अनूसचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- चिखली गावठाण, तळवडे, आयटीपार्क, गणेशनगर, मोरेवस्ती, पाटीलनगर आदी.प्रभाग २ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ठ भाग- चिखली गावठाण काही भाग, कुदळवाडी, जाधववाडी, बोऱ्हाडेवस्ती, जाधववाडी, राजे शिवाजीनगर आदी.प्रभाग ३ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ठ भाग- मोशी गावठाण, डुडुळगाव, चोविसावाडी, वडमुखवाडी, चऱ्होली, गंधर्वनगरी, संत ज्ञानेश्वर नगर आदी आदी.प्रभाग ४ : आरक्षण : अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- बोपखेल गावठाण, दिघी गावठाण, बनाचा ओढयापर्यंत आदी.प्रभाग ५ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ठ भाग- गवळीनगर, रामनगरी, संततुकारामनगर, चक्रपाणी, ज्ञानेश्वरनगर आदी.प्रभाग ६ : आरक्षण : अनुसुचित जमाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- सद्गुरूनगर, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, भगतवस्ती आदी.प्रभाग ७ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ठ भाग- भोसरी गावठाण, गव्हाणेवस्ती, सॅडवीक कॉलनी, खंडोबामाळ, शितलबाग, लांडेवाडी शांतीनगर आदी.प्रभाग ८ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- केंद्रीय विहार, जयगणेश साम्राज्य, इंद्रायणीनगर, बालाजीनगर, गवळीमाथा, महाराष्ट्र कॉलनी आदी.प्रभाग ९ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- विठ्ठलनगर, अंतरिक्ष सोसायटी, यशवंतनगर, नेहरूनगर, उद्यमनगर, अजमेरा, खराळवाडी, मासुळकर कॉलनी आदी.प्रभाग १० : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- शाहनूगर, संभाजीनगर, एचडीएफसी कॉलनी, दत्तनगर, विद्यानगर, इंदिरानगर, लालटोपीनगर, मोरवाडी आदी.प्रभाग ११ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- कृष्णानगर, कोयनानगर, महात्माफुलेनगर, नेवाळेवस्ती, पूर्णानगर, शरदनगर, हरगुडेवस्ती, स्वस्त घरकुल, अंजठानगर, दुर्गानगर आदी.प्रभाग १२ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ठ भाग- रूपीनगर, त्रिवेणीनगर, सहयोगनगर, ताम्हाणेवस्ती, म्हत्रेवस्ती आदी.प्रभाग १३ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- निगडी गावठाण, यमुनानगर प्राधिकरण आदी.प्रभाग १४ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ठ भाग- काळभोरनगर, मोहननगर, रामनगर, दत्तनगर, तुळजाईवस्ती, विठ्ठलनगर, चिंचवडस्टेशन, गणेश व्हिजन आदी.प्रभाग १५ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ठ भाग- वाहतूकनगरी प्राधिकरण, सेक्टर २६,२७,२४ चा काही भाग, आकुर्डी गावठाण, गंगानगर आदी.प्रभाग १६ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- मामुर्डी, किवळे, विकासनगर, रावेत, गुरूद्वारा, वाल्हेकरवाडी काही परिसर आदी.प्रभाग १७ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- वाल्हेकरवाडी काही भाग, चिंचवडेनगर, भोईरनगर, बिजलीनगर, दळवीनगर, प्रेमलोक पार्क आदी.प्रभाग १८ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ठ भाग- चिंचवड गावठाण, पवनानगर, रस्टन कॉलनी, केशनगर, यशोपुरम, तानाजीनगर, दर्शन हॉल, एसकेएफ आदी.प्रभाग १९ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- उद्द्योगगनर, क्चीनटाऊन, श्रीधरनगर, आनंदनगर, एम्पायर इस्टेस्ट, भाटनगर, भाजी मंडई आदी.प्रभाग २० : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- संततुकारामनगर, महात्मा फुलेनगर, महेशनगर, एचए, विशाल थिअटर, कासारवाडी कुंदननगरचा काही भाग आदी.प्रभाग २१ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- पिंपरीगाव, अशोक थिअटर, वैष्णोदेवी मंदिर, मासुळकर, जिजामाता हॉस्पिटल, मिलिंदनगर आदी.प्रभाग २२ : आरक्षण : ओबीसी. समाविष्ठ भाग- पवनागनर, काळेवाडी, विजयनगर, आदर्शनगर, तापकीरनगर, ज्योतिबानगर आदी.प्रभाग २३ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- शिवतीर्थनगर, समर्थनगर, पडवळनगर, सुंदर कालनी, साईनगर आदी.प्रभाग २४ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- गणेशनगर, म्हातोबानगर, क्रांतीनगर, पडवळनगर, गुजरनगर, बेलठिकानगर, मंगलनगर आदी.प्रभाग २५ : आरक्षण : अनुसुचित जातीी, ओबीसी. समाविष्ठ भाग-पुनावळे, ताथवडे, भुमकरवस्ती, वाकड, काळाखडक आदी.प्रभाग २६ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- पिंपळेनिलख, कस्पटेवस्ती, विशालनगर, कावेरीनगर, वेणूनगर, रक्षकसोसायटी आदी.प्रभाग २७ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग-तापकीरनगर, श्रीनगर, बळीराम गार्डन, रहाटणी, सिंहगड, रहाटणी, रायगड कॉलनी आदी.प्रभाग २८ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- पिंपळेसौदागर, कुणाल आॅयकॉन, रोड लॅन्ड, मिलेनियम, शिवार गार्डन, कापसे लॉन, रामनगर आदी.प्रभाग २९ : आरक्षण : अनुसुचित जमाती, ओबीसी. समाविष्ठ भाग-क्रांतीनगर, जवळकरनगर, शिवनेरी कॉलनी, भालेकरनगर, पिंपळेगुरव, सुदर्शनगर, वैदूवस्ती आदी.प्रभाग ३० : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- कासारवाडीचा काही भाग, फुगेवाडी, शंकरवाडी, दापोडी, सिद्धार्थनगर, कुंदननगर आदी.प्रभाग ३१ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- किर्तीनगर, विनायकनगर, गणेशनगर, कवडेनगर, विद्यानगर काही भागी, उरो रूग्णालय, राजीवगांधीनगर आदी.प्रभाग ३२ : आरक्षण : अनुसुचित जाती, ओबीसी. समाविष्ठ भाग- सांगवी गावठाणण, ढोरेनगर, मधूबन सोसायटी, जयमालानगर, कृष्णानगर, एसटी कॉलनी, शिवदत्तनगर, साईराज कॉलनी आदी.चिंचवडकर ठरणार निर्णायक महापालिका निवडणूकीत सर्वाधिक प्रभाग चिंचवड विधानसभेत असणार असून त्यापाठोपाठ भोसरी आणि पिंपरीत असणार आहेत. सर्वांधिक प्रभाग म्हणजे ५२ वॉर्ड चिंचवडमध्ये असणार आहे. त्यामुळे चिंचवडकरांची भूमिका सत्तेत निर्णायक ठरणार आहे.

संभाव्य जागा विधानसभा निहायचिंचवड५२पिंपरी३२भोसरी४४एकुण १२८