शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत वर्धा बाजारपेठेतून ‘चायना मेड’ हद्दपार

By admin | Updated: October 26, 2016 18:39 IST

दरवर्षी बाजारात चिनी वस्तूंवरच अधिक भर दिसतो; पण यंदा देशात घडत असलेल्या घडामोडी आणि शासनाचे आवाहन लक्षात घेत बाजारातून ‘चायना मेड’ हद्दपार

ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 26 - दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. या सणासाठी नागरिक आसुसलेले असतात. घरांची डेंटींग-पेंटींग, सजावट यासाठी वर्षातून एकदा दिवाळीला खरेदी केली जाते. विविध वस्तूंची खरेदी, रोषणाईसाठी दिवे आदी सर्व वस्तूंची खरेदी केली जाते. दरवर्षी बाजारात चिनी वस्तूंवरच अधिक भर दिसतो; पण यंदा देशात घडत असलेल्या घडामोडी आणि शासनाचे आवाहन लक्षात घेत बाजारातून ‘चायना मेड’ हद्दपार झाल्याचेच दिसून येत आहे.
दिवाळी सणासाठी सध्या बाजार सजला आहे. विविध आकर्षक वस्तू बाजारात उपलब्ध करून ग्राहकांची मागणीही वाढत असल्याचे दिसून येत आहे. घरांच्या सुशोभिकरणासाठी झालर, प्लास्टिक व अन्य वस्तंूपासून तयार आकर्षक घंटी, तोरणे बाजारात अवतरली आहेत. या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांचीही गर्दी होत असल्याचे पाहावयास मिळते. दिवाळी सणासाठी पणत्यांनी बाजार सजला आहे.
गत काही वर्षांपासून बाजारपेठेतील प्रत्येक वस्तूंमध्ये ‘चायना मेड’चा शिरकाव झाला होता. यावर्षी मात्र देशपातळीवरील घडामोडींमुळे चिनी वस्तूंचा प्रभाव कमी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. आकाश कंदील, पणत्या, सजावटीच्या वस्तूंमध्ये चिनी शिरकाव होता; पण यंदा नागपूर, मुंबई यासह देशातील अन्य भागात तयार वस्तूंची भरमार असल्याचे दिसून येते. दुकानदारांनीही यंदा शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत चायना मेड वस्तू विकण्यापासून फारकत घेतल्याचे बाजारात फेरफटका मारला असता दिसून आले.
यावर्षी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्येही ‘चायना मेड’ला फटका बसत असल्याचे दिसून येत आहे. केवळ मोबाईल सोडले तर अन्य वस्तूंमध्ये ‘मेड इन इंडिया’ला प्राधान्य दिले जात असल्याचेच दिसून येत आहे. घरांच्या सुशोभिकरणासाठी वापरल्या जाणाºया सिरीजमध्येही चायना मेडला हद्दपार करण्यात आले आहे.
बहुतांश इलेक्ट्रीशीयन, कारागिर व दुकानदारांनी भारतात तयार झालेल्या सिरीज, विविध प्रकारचे दिवे वापरावर भर दिल्याचे दिसून येत आहे. काही इलेक्ट्रीशियनकडून इमारतींची रोषणाई करण्याचे कंत्राट घेतले जातात. यासाठीही त्यांच्याकडून भारतीय बनावटीच्या सिरीज, दिव्यांचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)