शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

स्कूल बसमध्ये दप्तर अडकल्याने चिमुकलीचा लोहगावात मृत्यू

By admin | Updated: June 27, 2016 00:53 IST

स्कूल बसच्या दरवाजामध्ये दप्तर अडकल्यामुळे हिसका बसून तोंडावर आपटलेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पुणे : स्कूल बसच्या दरवाजामध्ये दप्तर अडकल्यामुळे हिसका बसून तोंडावर आपटलेल्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी दुपारी लोहगाव येथील एअरफोर्स स्टेशन आॅफिसर्स क्वाटर्स येथे घडला होता. आरोपी स्कूल बसचालक स्वत: पोलिसांकडे हजर झाला असून, त्याला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. अवनी धर्मेंद्रकुमार (वय ५) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. याप्रकरणी बाळू नामदेव हटकर (वय २६, रा. मोझेआळी, लोहगाव) या स्कूल बसचालकाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवनी वायुदलाच्या केंद्रीय विद्यालयात ज्युनिअर केजीमध्ये शिकत होती. तिचे वडील वायुदलामध्ये अधिकारी आहेत. तिला शाळेमध्ये नेण्या- आणण्यासाठी स्कूल बस लावलेली आहे. शुक्रवारी दुपारी अवनी शाळा सुटल्यानंतर, या स्कूल बसमधून घरी येत होती. एकेका विद्यार्थ्याला सोडत सोडत अवनीला सोडण्याचे ठिकाण आले. ती खाली उतरत असताना तिच्या दप्तराचा बंद अ‍ॅटोमॅटीक बंद होणाऱ्या दरवाजामध्ये अडकला. हटकर याने बस सुरू करून पुढे घेतली असता, अवनीला हिसका बसला. अवनी तोंडावर आपटल्यामुळे गंभीर जखमी झाली. डोक्याला मार लागून तिच्या नाकामधून रक्त आले होते. हटकर याने तिला दुसऱ्या स्कूल बसमधून खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. सर्व विद्यार्थ्यांना घरी सोडल्यानंतर, तो स्वत: पोलिसांकडे हजर झाला. त्याला अटक करण्यात आली आहे.