शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्यांच्या घरट्यात चिऊताईचा मुक्काम...

By admin | Updated: October 19, 2016 01:24 IST

चिमणा-चिमणीची जोडी आपल्या होणाऱ्या पिलांसाठी शाळेच्या वर्गात घरटे बांधू लागतात

रविकिरण सासवडे,

बारामती- चिमणा-चिमणीची जोडी आपल्या होणाऱ्या पिलांसाठी शाळेच्या वर्गात घरटे बांधू लागतात... वर्गातील चिमुकले चिमणा-चिमणीची ही लगबग कौतुकाने बघत असतात, मात्र सिमेंटच्या बांधलेल्या वर्गखोल्यांमध्ये या इवल्याशा जिवांचे घरटे बांधण्याचे सारे प्रयत्न निष्फळ ठरतात. शेवटी वर्गातील चिमुकल्यांनीच या चिऊताईसाठी छानसे घरटे तयार केले व वर्गामध्ये टांगले. या चिमणा-चिमणीच्या जोडीनेही चिमुकल्या दोस्तांनी केलेल्या घरट्यात आपला संसार थाटला, तसं या चिमुकल्यांनीही आनंदाने टाळ््या पिटल्या.शेळगाव-महादेवनगर (ता. इंदापूर) भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील हा सुखद अनुभव. एरवी पर्यावरणावर केवळ बौद्धिक घेणाऱ्यांना या चिमुकल्यांच्यां कृतीतून सणसणीत उत्तर मिळाले. या शाळेतील छोट्या दोस्तांची कृती तशी साधीच, दररोजच्या दैनंदिन जीवनात पशूपक्ष्यांच्या अशा मूलभूत गरजांकडे किती जणांचे लक्ष जाते, म्हणूनच या पार्श्वभूमीवर या विद्यार्थ्यांची कृती कौतुकास पात्र आहे. आपल्या वर्गात चिमणी घरटे करते, म्हटल्यानंतर वर्गातील चिमुरडे भलतेच खुश झाले होते. दररोज त्या चिमणा-चिमणीच्या जोडप्याची घरटे बांधण्याची लगबग डोळ््याने ते टिपत होते. परंतु सिमेंटच्या छान रंगवलेल्या वर्गखोल्यांमध्ये चिमणा-चिमणीला घरटे करण्यासाठी योग्य जागा मिळाली नाही. घरटे करण्यासाठी चिऊताई तोंडात काडी घेऊन वर्गभर घिरट्या घालीत असे. वर्गात एखाद्या ठिकाणी चिऊताईने घरटे विणायला घेतले, की अल्पावधीतच घरट्याचा सारा सांगाडा खाली कोसळे. चिऊताईच्या या प्रयत्नांचे चिमुरड्यांनाही भारी कौतुक वाटत असे. चिऊताईचे प्रयत्न निष्फळ ठरले. आता चिऊताई आपल्या वर्गात राहणार नाही, त्यामुळे सारी मुले हिरमुसली. >या वेळी वर्गशिक्षक असलेल्या नितीन मिसाळ यांनी, ‘आपण बनवू चिऊताईसाठी घर’ असे सांगताच वर्गातील लहानगी फौज कामाला लागली. शाळेतच पडलेले टाकाऊ सामान गोळा केले. एका पाइपपासून छान घरटे बनवले गेले. त्याला नाव दिले ‘चिऊताईचे घरटे,’ हे घरटे जेव्हा वर्गाच्या छताला अडकवले व एक-दोन दिवसांनंतर चिऊताईने ते स्वीकारले तेव्हा कोमल जाधव, निकिता जाधव, श्रुती ननावरे, सूरज अवघडे, अनुष्का जाधव, ओम शिंदे या विद्यार्थ्यांना आनंद झाला.