शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्तेसाठी मुलाकडून आईचा छळ; गुन्हा दाखल

By admin | Updated: March 3, 2017 01:27 IST

जिल्ह्यात पहिलाच गुन्हा : सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या घरातील प्रकार

अकोला, दि.२ : आईचा सांभाळ न करता, तिला संपत्तीमध्ये वाटा मागण्यासाठी मोठा मुलगा आईचा मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याची तक्रार गुरुवारी सायंकाळी खदान पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी मोठ्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ज्येष्ठ नागरिक व पालक संरक्षण कायद्यात दाखल करण्यात आलेला गुन्हा जिल्ह्यातील पहिला असल्याची माहिती ठाणेदार गजानन शेळके यांनी दिली. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस खात्यात सेवानिवृत्त झालेले एक अधिकारी राहतात. गुरुवारी त्यांच्या पत्नीने खदान पोलीस ठाण्यात मोठ्या मुलाविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीमध्ये त्यांचा मोठा मुलगा हा संपत्तीमध्ये वाट मागत असून, त्यासाठी आईला मारहाण करतो. आईचा सांभाळ करण्याची जबाबदारी असतानाही तिचा सांभाळ करीत नाही. तसेच आईचा मानसिक व शारीरिक छळ करतो. मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार दिली तर समाज आपल्याला काय म्हणेल, आपले पती पोलीस खात्यातून अधिकारी म्हणून निवृत्त झाले. त्यांची प्रतिष्ठा, रुबाब बघता, आईने मुलाविरुद्ध तक्रार केली नाही; परंतु मोठ्या मुलाचा अत्याचार असह्य झाल्यामुळे अखेर आईने गुरुवारी सायंकाळी खदान पोलीस ठाणे गाठले आणि मुलाविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीमध्ये आपल्याला दोन मुले, एक मुलगी आहे. लहान मुलगा व मुलगी पुण्याला राहतात. मोठा मुलगा त्यांच्याकडे राहतो. तो कोणताही कामधंदा करीत नाही. उलट संपत्तीमध्ये वाटा मागण्यासाठी भांडतो आणि प्रसंगी मारहाण करतो, असे म्हटले आहे. आईच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी मोठ्या मुलाविरुद्ध ज्येष्ठ नागरिक व पालक यांच्या मालमत्तेचे व जीविताचे संरक्षण करणारा कायदा कलम २४(२00७) नुसार गुन्हा दाखल केला. शासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि मालमत्तेच्या रक्षणासाठी कायदा केलेला आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांना मुलांकडून काही त्रास असल्यास पोलिसांसोबत संपर्क साधावा. - गजानन शेळके, ठाणेदार खदान पोलीस स्टेशन