शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

झोपडीत कार घुसून बालकाचा मृत्यू

By admin | Updated: October 5, 2015 02:27 IST

रस्त्याकडेला असलेल्या झोपडीमध्ये कार घुसून झालेल्या भीषण अपघातात ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या आईसह कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले.

शेंद्रे (जि. सातारा) : रस्त्याकडेला असलेल्या झोपडीमध्ये कार घुसून झालेल्या भीषण अपघातात ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर त्याच्या आईसह कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सातारा-आसनगाव रस्त्यावरील सोनगाव, ता. सातारा येथील बसथांब्याजवळ रविवारी सायंकाळी ७ वाजता झाला. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्लोक युवराज मदने (११ महिने) असे ठार झालेल्या बालकाचे नाव, तर सोनाली युवराज मदने (२२), नीता विनोद मदने (२५), पूर्वा विनोद मदने (३), उदय विनोद मदने (अडीच वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. सातारा-आसनगाव रस्त्याच्या कडेला सोनगाव येथे युवराज मदने आणि विनोद मदने यांची कुडाची झोपडी आहे. रविवारी सायंकाळी सोनाली, नीता या स्वयंपाक करत होत्या. याचवेळी भरधाव कार अचानक झोपडीत घुसली. सर्व जण कारखाली सापडले. जमलेल्या नागरिकांनी सुमारे २० मिनिटांच्या प्रयत्नानंतर चक्क कार उचलून जखमींना बाहेर काढले.अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन कारचालक मुकुंद परशुराम साळुंखे (रा. सोनगाव) व त्याची कार ताब्यात घेतली. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (वार्ताहर)