शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या प्रश्नांचाही जाहीरनामा हवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 06:25 IST

सेवाभावी संस्थेची अपेक्षा : संवाद साधून संकलित केल्या गरजा

मुंबई : देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ४० टक्के प्रमाण मुलांचे असल्याने, यंदाच्या निवडणुकीत मुलांचे प्रश्न आणि त्यांच्या गरजा उमेदवारांनी विचारात घेण्याचे आवाहन ‘क्राय’ या सेवाभावी संस्थेने केले आहे. त्यासाठी त्यांनी काही बालकांचे सर्वेक्षण केले. डिजिटल क्लासरूम, कार्यान्वित असणारी शौचालये, मुलींसाठी वेगळी स्वछतागृहे, संगणक शिक्षण या बालकांच्या मुख्य गरजा असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.

‘क्राय’ या लहान मुलांसाठी काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेकडून ‘#चिल्ड्रेनमॅटर’ हा सर्व्हे हाती घेण्यात आला. यात संस्थेने यंदाच्या निवडणुकीत बालकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा आणि त्यांच्या अपेक्षाही जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. क्राय व सोबतच्या काही सेवाभावी संस्थांनी क्रायच्या विविध प्रकल्प क्षेत्रांमध्ये १००० हून अधिक बालकांशी शिक्षण, आरोग्य व पोषण, संरक्षण व सुरक्षा, राहणीमानाचा दर्जा व अस्तित्व यांच्याशी संबंधित दैनंदिन आव्हान ठरणाऱ्या निरनिराळ्या समस्यांबाबत संवाद साधला. या संवादादरम्यान आढळलेले निष्कर्ष क्रायने ‘आमच्या सरकारकडून आमच्या अपेक्षा : भारतातील बालकांचा आवाज’ या अहवालाच्या स्वरूपात जाहीर केल्या आहेत.

शाळेतील पिण्याच्या पाण्यासोबत, निरोगी आरोग्य, त्यासाठी आवश्यक सोईसुविधा, पोषक आहार अशा अपेक्षाही मुलांनी अहवालात आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. २०१६-१७च्या युडायस डेटाप्रमाणे देशातील केवळ ५ टक्के शाळा या मुलांना १ ते १२वी पर्यंतचे संपूर्ण शिक्षण देतात, त्यामुळे शिक्षण हक्क कायद्याची संपूर्ण अंमलबजावणी अद्याप तरी कठीणच आहे.याशिवाय देशातील एक तृतीयांशपेक्षाही कमी शाळांत संगणक शिक्षण दिले जाते. त्यामुळे ही परिस्थिती समोर ठेवून मुलांच्या या अपेक्षा पूर्ण करण्याची आणि त्यांचे जीवन अधिक उत्तम करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दर्शविण्याची जबाबदारी आता आपली असल्याचे मत, क्राय संस्थेचे (पश्चिम) प्रादेशिक संचालक क्रीयान रबाडी यांनी व्यक्त केले.बालकांसाठी मॉक मतदानाचा कार्यक्रमबालकांना केंद्रस्थानी ठेवून विचार करण्यासाठी लोकांना प्रवृत्त करण्याच्या वरील प्रयत्नाचा भाग म्हणून क्रायचे स्वयंसेवक ६ एप्रिल रोजी फिनिक्स मार्केट सिटी, कुर्ला येथे आणि १३ एप्रिल रोजी रघुलीला मॉल, वाशी येथे मॉक बुथ उभारणार आहेत. येथे लोकांना बालकांबद्दलची स्वप्ने पिवळ्या चिठ्ठीवर लिहिण्याचे आणि आपले मत बालकांसाठी नोंदविण्याचे आवाहन करणार आहेत. त्या बदल्यात, क्रायचे स्वयंसेवक लोकांच्या बोटावर पिवळा ठिपका (मतदानानंतर लावल्या जाणाºया निळ्या शाईऐवजी) लावणार आहेत.