शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनी केले आईचे अवयवदान, तिघांना मिळाले जीवनदान!

By admin | Updated: July 24, 2016 05:21 IST

दोन दिवस सुरू असलेली डोकेदुखी असह्य झाल्याने बुधवारी एक महिला रुग्णालयात दाखल झाली. तपासण्या करत असतानाच त्या महिलेला ब्रेनहॅमरेज झाल्याचे निदान झाले.

मुंबई: दोन दिवस सुरू असलेली डोकेदुखी असह्य झाल्याने बुधवारी एक महिला रुग्णालयात दाखल झाली. तपासण्या करत असतानाच त्या महिलेला ब्रेनहॅमरेज झाल्याचे निदान झाले. ब्रेन हॅमरेजमुळे एका दिवसात या महिलेचा मेंदू मृतावस्थेत गेला. त्यानंतर, तिच्या वैभव (वय १६) आणि रवी संघवी (वय १४) लहान मुलांनी आईचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. या महिलेची मूत्रपिंड, यकृत, त्वचा आणि डोळे दान करण्यात आले. दादर परिसरात राहणारी ही महिला स्वयंपाकाची कामे करत होती. पतीच्या निधनानंतर दोन्ही मुलांचा सांभाळ महिला एकटीच करत होती. १९ जुलैपासून या महिलेचे डोके दुखत होते. त्यामुळे ती डॉक्टरांकडे गेली. त्या वेळी तिचा रक्तदाब वाढल्याचे निदान झाले. त्यानुसार, डॉक्टरांनी तिला गोळ््या दिल्या, पण डोकेदुखी थांबत नसल्याने दादरचे हिंदुजा रुग्णालय गाठले. त्या वेळी तिची दोन्ही मुले तिच्याबरोबर होती. ‘आमच्या आईला बर करा,’ असेही त्यांनी या वेळी डॉक्टरांना सांगितले असल्याची माहिती रुग्णालयाच्या प्रत्यारोपण समन्वयक डॉ. सुचेता देसाई यांनी दिली. २२ जुलै रोजी उपचारादरम्यान या महिलेला ब्रेनडेड घोषित करण्यात आले. या वेळी तिचा दीर आणि भाऊ रुग्णालयात होते. मुलांनी परवानगी दिली तर अवयवदान करू, असे दोघांनीही सांगितले. त्यामुळे मुलांकडे अवयवदानाची विचारणा केली असता, त्यांनी तत्काळ होकार दिला. ‘आम्ही लहान आहोत, म्हणून सही करूशकत नाही, पण आमच्या आईच्या अवयवामुळे दुसऱ्यांचा जीव वाचला, तर आम्हाला आनंद होईल, असे त्यांनी सांगितले. रुग्णालयातर्फे दात्याचे नातेवाईक मुलांशी बोलून हा निर्णय घेण्यात आला. या महिलेचे हृदय दान करण्याची तयारी दाखविली होती. पण, त्यावेळी हृदयदान होऊ शकले नसल्याचे डॉ. देसाई यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पालिका रुग्णालयात ५ जणांचे अवयवदान - जनजागृतीमुळे मेंदू मृतावस्थेत असणाऱ्यांचा अवयवदानाचा टक्का वाढलेला आहे. तथापि, खासगी रुग्णालयात अवयवदानाचे प्रमाण अधिक आहे. गेल्या सात महिन्यांत महापालिकेच्या प्रमुख तीन रुग्णालयातून ५ जणांनी अवयव दान केले आहे. - १६ जुलैला केईएम रुग्णालयातील एक ५६ वर्षीय पुरुष मेंदू मृतावस्थेत असल्याचे निदान झाले. त्याचा अपघात झाला होता. या पुरुषाचे यकृत दान करण्यात आले. या पुरुषाचे यकृत केईएममधील रुग्णाला देण्यात आल्याची माहिती प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी दिली.