शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांच्या मुलांसाठी...

By admin | Updated: May 1, 2017 05:12 IST

विकासाच्या प्रचंड वेगवान प्रक्रियेमध्ये वंचितांचा टक्काही तेवढ्याच झपाट्याने वाढत आहे. शिक्षणाच्या अभावाने आलेले त्यांचे

लक्ष्मण मोरे / पुणेविकासाच्या प्रचंड वेगवान प्रक्रियेमध्ये वंचितांचा टक्काही तेवढ्याच झपाट्याने वाढत आहे. शिक्षणाच्या अभावाने आलेले त्यांचे ‘पिचले’पण दूर करण्यासाठी एका तरुणाने १६ वर्षांपासून ज्ञानयज्ञ मांडला आहे. मुलांना घडविण्यासाठी हा तरुण ‘बाल शिक्षण मंच’ नावाच्या संस्थेच्या माध्यमातून काम करीत आहे.औद्योगिक वसाहतीमध्ये रिक्षाचालक वडील आणि धुणीभांडी करणाऱ्या आईच्या पोटी अमरचा जन्म झाला. अमरने एमएसडब्ल्यूपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असताना पुणे महापालिकेने प्रौढ साक्षरता अभियानाची सुरुवात केली. त्यामध्ये त्याने स्वयंसेवक म्हणून सहभाग घेतला. यानिमित्ताने त्याचा झोपडपट्टीतील अनेक कुटुंबांशी संवाद होऊ लागला. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचा प्रभाव अमरवर पडला होता. अमरने वस्तीतील काही मुले गोळा केली. त्यांच्या अभ्यासाची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने स्थापन झाली ‘बाल शिक्षण मंच’ ही छोटेखानी संस्था. महापालिकेच्या शिक्षण मंडळाला विनंती करून मंचाने महर्षीनगर भागातील संत ज्ञानदेव शाळेचा एक वर्ग मागून घेतला. शाळेमधून सुटल्यावर ही मुले अभ्यासिकेत जाऊ लागली. सोळा वर्षांपूर्वी लहानग्यांना घेऊन  सुरु केलेली अभ्यासिका आता विस्तारली आहे.  झोपडपट्टीमधूनही उत्तम आणि सुशिक्षित व्यक्तिमत्त्वे घडू शकतात, हे अमरने दाखवून दिले आहे. ‘आम्ही उद्याचे शिल्पकार’ हा उपक्रम सध्या सुरू आहे.