शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी मुले, मुली पोहोचले स्मशानभूमीत

By admin | Updated: November 19, 2014 23:17 IST

नवा आदर्श : फाटक हायस्कूल, गांगण महाविद्यालयाचा उपक्रम...

रत्नागिरी : रत्नागिरीत स्वच्छता मोहीम दिमाखात सुरू असून, या मोहिमेला विविध स्तरांतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी शहरातील फाटक प्रशाला व वि. स. गांगण कनिष्ठ महाविद्यालयाने तर मुरुगवाडा येथील श्रीमान भागोजीशेठ कीर अमरधाममध्ये स्वच्छता मोहीम राबवून एक नवा आदर्श निर्माण केला. ज्याठिकाणी माणसाचा प्रवास संपतो, त्याच ठिकाणाहून या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवून नवा आदर्श घातला.या मोहिमेत दीडशे विद्यार्थी, विद्यार्थिनींसह संस्था पदाधिकारी, शिक्षकांनी भाग घेतला. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनीही नगरपालिकेतर्फे अग्निशम बंब, जेसीबी मशिनची मदत केली. दि न्यु एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. बाबासाहेब परुळेकर, सचिव दाक्षायिणी बोपर्डीकर, सुमिता भावे, मुख्याध्यापक आनंदा मोरबाळे यांच्यासह सर्व शिक्षक, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, उपनगराध्यक्ष संजय साळवी यांनी स्वच्छता मोहीमेत भाग घेतला.या अमरधामच्या आवारात वाढलेले गवत, बाटल्या, लाकडांचे तुकडे, अन्य वस्तूंची साफसफाई करण्याचे काम केले. येथील काळवंडलेल्या भिंंती, फलकांना रंगरंगोटी करण्यात आली. नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनीही स्वत: स्वच्छतेत भाग घेतला. शहरात सर्वत्र स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. मात्र, मृत्यूनंतर जिथे दहन केले जाते, अशा स्मशानभूमीकडे लक्ष दिले नव्हते. त्यामुळे फाटक प्रशालेने येथे सफाई मोहीम आखली. सकाळी आठ वाजता कामाला सुरूवात झाली. अकरा वाजेपर्यंत सफाईचे काम पूर्ण करण्यात आले. गवत साफ करण्यासाठी विद्यार्थ्यांना हातमोजे, मास्क देण्यात आले होते. तसेच काळवंडलेल्या भिंतींना निळा रंग लावण्यात आला. याशिवाय भागोजीशेठ कीर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अर्धाकृती पुतळ्याची सफाई करून, पुसलेल्या पाट्यांची रंगरंगोटीही केली. स्मशानभूमीच्या बाहेर वाढलेले गवतही कापण्यात आले. यावेळी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाद्वारे पाणी सोडून स्वच्छता करण्यात आली. विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींनीही यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. याचे विशेष कौतुक करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)