शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

काडतुसे शोधण्यास मुलांना जुंपले

By admin | Updated: June 27, 2014 00:31 IST

येथील रेल्वे स्थानकाच्या पुढे दिल्ली-चेन्नई मार्गावर दोन ट्रॅकच्या मधोमध असलेल्या नाल्यात गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर काडतुसे सापडत आहेत. ही काडतुसे शोधण्यासाठी पोलिसांनी चक्क

चंद्रपुरातील प्रकार : मजुरीपोटी पहिल्या दिवशी दिले ७० रुपयेचंद्रपूर : येथील रेल्वे स्थानकाच्या पुढे दिल्ली-चेन्नई मार्गावर दोन ट्रॅकच्या मधोमध असलेल्या नाल्यात गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणावर काडतुसे सापडत आहेत. ही काडतुसे शोधण्यासाठी पोलिसांनी चक्क अल्पवयीन मुलांना जुंपल्याचा संतापजनक प्रकार पुढे आला आहे. सूरज बत्तलवार (१७) व मो.सय्यद (१४) अशी या मुलांची नावे आहेत. सूरज हा नवव्या वर्गात शिकत असून मो.सय्यद आठवीचा विद्यार्थी आहे. २२ जूनला दुपारी हे दोघे या नाल्यात मासे पकडत असताना त्यांच्या हाती काही काडतुसे लागली होती. त्यांनी याबाबत जवळच्या पानटपरी चालकाला सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या नाल्यात शोधमोहिम सुरू केली. त्यासाठी मनपा कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात आले. मात्र त्यांच्यासोबत पोलिसांनी या दोघांनाही शोध कामात जुंपले. गेल्या चार दिवसांपासून ही दोन्ही मुले काडतूसे शोधण्याच्या कामी आहेत. पहिल्या दिवशी पोलिसांकडून मजुरीपोटी आम्हाला केवळ ७० रुपये देण्यात आले, असे या मुलांनी सांगितले. त्यानंतर मात्र काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण पैसे देऊ, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे २६ जूनला पहिल्या दिवशी दोघेहीे शाळेत जाऊ शकली नाही. एकीकडे अल्पवयीन मुलांना कामावर जुंपण्यात येऊ नये, असा कायदा असताना कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांनीच हा कायदा मोडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यामुळे आता याप्रकरणी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)