शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशी अहवालात काय?; कारण अद्यापही गुलदस्त्यात
2
रस्ते बंद केले, नेत्यांची धरपकड केली, कार्यकर्त्यांना डांबले तरीही ‘मराठी’ ताकद रस्त्यावर दिसली
3
महामुंबई तापाने फणफणली! खोकून खोकून घसा लाल, ताप-सर्दीची लागण झपाट्याने वाढतेय
4
विधानमंडळ सचिव भोळे यांचे पंख छाटले; अन्य ३ सचिवांना सभापतींनी दिल्या जबाबदाऱ्या
5
बेकायदा लाऊडस्पीकर रोखल्याचा दावा; सरकारवर अवमानाची कारवाई करण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
विमानांचे वाढते तिकीट दर नियंत्रित करणार; डीजीसीएनं लोकलेखा समितीच्या बैठकीत दिली हमी
7
लाखभर शाळांचे शाळाबाह्य मूल्यांकन ३१ जुलैपर्यंत; ‘पीएम श्री’ शाळांचाही समावेश
8
संविधान हे देशातील रक्तविरहित क्रांतीचे शस्त्र; सरन्यायाधीश गवई यांचा महाराष्ट्र विधिमंडळातर्फे सत्कार
9
‘एक्स’वर ७० रुपयांत जेवण, स्टेशनवर ‘ढूंढते रह जाओंगे’; रेल्वेची करामत, प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर 
10
टेनिस बॉल क्रिकेटमुळे होणार दादोजी कोंडदेव स्टेडियम ‘बोल्ड’; सीझन बॉल स्पर्धेलाच मैदान देणार
11
कुजबुज! रामदास आठवलेंच्या भूमिकेत एकनाथ शिंदे, गवईंच्या सत्कार सोहळ्यात सगळे हसले
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

बालकाश्रमातील विद्यार्थी जाणार विदेशात

By admin | Updated: January 10, 2015 00:11 IST

अटकेपार झेंडा : बालकाश्रमातून शिक्षण घेणाऱ्या दोघांचा सर्वांसमोर आदर्श, कष्टाला मिळाला न्याय

राजापूर : अपार कष्ट सहन करीत, मिळेल ती संधी आपल्यासाठी सोन्याचे आयुष्य घेऊन येणार असल्याची भावना ठेवून शिक्षण पूर्ण केले. बालकाश्रमात राहिलेले वैभव रवींद्र कोळेकर व सिद्धेश जागुष्टे हे शिक्षण पूर्ण केल्यावर आता नोकरीसाठी हाँगकाँग व कॅनडा येथे जात आहेत.वात्सल्य मंदिर संचालित बालकाश्रम, ओणी येथे स्वयंसेवी संस्थेत या दोघांनीही शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीनिमित्त ते भारताबाहेर जात आहेत.वैभव कोळेकर हा वयाच्या नवव्या वर्षी आपल्या मोठ्या भावासह वात्सल्य मंदिर, ओणी येथे दाखल झाला. १० सप्टेंबर २००३ रोजी त्याने प्रवेश घेतला व दहावीपर्यंतचे शिक्षण या शिक्षण संस्थेत राहून पूर्ण केले. उपजत चित्रकलेची आवड लक्षात घेऊन त्याचे पुनर्वसन करण्यासाठी संस्थेने त्याला सावर्डे येथील सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट विद्यालयात प्रवेश दिला. चिपळूण (खेर्डी) येथील समाजकल्याण वसतिगृहात राहण्याची सोय केली. तेथे शिल्पकार प्रकाश राजेशिर्के यांनी त्याच्यातील उपजत कलेला योग्य तो आकार देत कलाकार जिवंत केला. आज पाच वर्षांच्या कालावधीत वैभवने जीडी आर्ट कोर्स पूर्ण केला आहे. आता आपल्या अंगभूत कौशल्याच्या आधारावर स्वत:ची कला दाखवण्यासाठी हाँगकाँग येथे भरारी घेतली आहे.सिद्धेश सुरेश जागुष्टे हा विद्यार्थी कुटुंबातील गरीब परिस्थितीवर मात करीत या बालकाश्रमात दाखल झाला होता. त्यानेही ओणी येथे ९ जून २००३ रोजी प्रवेश घेतला व दहावीपर्यंतचे शिक्षण संस्थेत राहून केले. नवी मुंबई येथे पुढील शिक्षण घेऊन आता तो बी. ई. झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी नोकरीनिमित्त पुढील महिन्यात तो कॅनडा येथे दोन वर्षांसाठी रवाना होत आहे. येथे यंत्रमानवाच्या तंत्रज्ञानावर तो काम करणार आहे.या विद्यार्थ्यांनी अपार कष्ट घेत शिक्षण पूर्ण करुन कलाकौशल्याला वाव मिळण्यासाठी भरारी मारली आहे. ओणी येथील बालकाश्रमात शिक्षण घेत रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी दोन विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट उल्लेखनीयच म्हणावे लागतील. (प्रतिनिधी)दोन विद्यार्थ्यांनी आश्रमात राहून शिस्त व शिक्षण पूर्ण केले. ध्येयाने प्रेरित होऊन आता परदेश वारीसाठी त्यांनी मोट बांधली आहे. या ठिकाणी हे विद्यार्थी कुटुंबाचे, मार्गदर्शकांचे व ज्या ठिकाणी शिक्षण घेतले त्या संस्थेला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करतील, असा विश्वास वात्सल्य मंदिर संचलीत बालकाश्रमाच्या व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.शिक्षण घेत आपल्या अंगभूत कौशल्यांना वाव देण्याचा प्रयत्न. ओणी, सावर्डे, वाशी आता हाँगकाँगपर्यंतचा प्रवास. चित्रकलेची आवड लक्षात घेऊन सह्याद्रीने दिला वाव.प्राचार्य प्रकाश राजेशिर्के यांनी अधिक शिक्षणासाठी दिला आपल्याला आकार.नव्या आयुष्याला सुरूवात.