शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन विहीर वाचवण्यासाठी वृद्धाची धडपड

By admin | Updated: May 18, 2015 04:09 IST

पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी वणवण भटकून रक्ताचे पाणी करणाऱ्या दिव्यातील नागरिकांची पाण्याच्या समस्येमधून काही प्रमाणात सुटका व्हावी,

कुमार बडदे, मुंब्रापाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी वणवण भटकून रक्ताचे पाणी करणाऱ्या दिव्यातील नागरिकांची पाण्याच्या समस्येमधून काही प्रमाणात सुटका व्हावी, यासाठी येथील ब्रिटिशकालीन विहिरीवरील अतिक्र मण हटवण्यासाठी येथील जीवन म्हात्रे गेल्या चार वर्षे सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. दुर्देवाने शासन दरबारी आणि लोकप्रतिनिधींकडून म्हात्रेंसारख्या वृद्धाला न्याय न मिळाल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे.दिवा (पूर्व) भागातील पाणीटंचाई दूर व्हावी, यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात येथील सर्व्हे क्रमांक २४ अ/६ मधील दोन गुंठे जागेवर तत्कालीन ग्रामस्थांनी निधी जमा करून विहीर बांधली होती. परंतु मागील ४ वर्षांपासून त्या विहिरीजवळ राहणाऱ्या काही जणांनी विहिरीवर लोखंडी जाळी टाकून त्यावर अतिक्र मण केले आहे. या अतिक्रमण करणा-यांकडून परस्पर त्यातील पाण्याचा वापर त्यांच्या इमारतीसाठी सुरू केला आहे. स्थानिक नागरिकांना मात्र त्या विहिरीतील पाण्याच्या वापर करण्यास मज्जाव केला असल्याचा दावा म्हात्रे यांनी केला आहे. यामुळे विहिरीच्या जवळपास राहणारे नागरिक तिच्या पाण्याच्या वापरापासून वंचित आहेत. त्यांची ही अडचण दूर व्हावी आणि त्यांनाही या विहिरीचे पाणी वापरता यावे, यासाठी संबंधित विहिरीवरील अतिक्र मण हटविण्यात यावे, याकरिता म्हात्रे चार वर्षांपासून शासनदरबारी वारंवार विनंती, अर्ज करीत आहेत.