शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

लहान मुलांच्या दृष्टिकोनातून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे

By admin | Updated: January 18, 2016 00:52 IST

आजचा बालवाचक हा लिहिणाऱ्या साहित्यिकांपेक्षा १० टक्के पुढे आहे. यामुळे त्या बालसाहित्यिकांच्या दृष्टिकोनातून विचार करून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे,

प्राची मानकर, ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी)आजचा बालवाचक हा लिहिणाऱ्या साहित्यिकांपेक्षा १० टक्के पुढे आहे. यामुळे त्या बालसाहित्यिकांच्या दृष्टिकोनातून विचार करून बालसाहित्य निर्माण झाले पाहिजे, तरच बालसाहित्य हे सकस होईल. तसेच पालक आणि समाज यांच्यातसुद्धा अभिरुची निर्माण झाली पाहिजे, तरच बालसाहित्य हे सकस होईल, असे मत बालसाहित्य व बालरंगभूमी सकस आहे का, या परिसंवादात व्यक्त करण्यात आले.८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘आजचे बालसाहित्य व बालरंगभूमी सकस आहे का?’ या विषयावरील परिसंवाद आचार्य अत्रे रंंगमंदिरात झाला. या वेळी सुरेश सावंत, माणिक वड्याळकर, डॉ. कांचन सोनटक्के, राजीव तांबे, स्वाती राजे, रमेश तांबे, महावीर जोंधळे या परिसंवादात सहभागी झाले होते. डॉ. डी. वाय. पाटीलच्या प्राचार्या रेखा पाठक, विश्वास वसेकर उपस्थित होते.आजचे बालसाहित्य सकस आहे का, सकस असेल तर ते अधिक सकस कसे होईल, याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच बालसाहित्य हा विषय शाळेमध्ये स्वतंत्रपणे अभ्यासला गेला पाहिजे. यामुळे बालसाहित्याला एक वेगळीच दिशा मिळेल, असे स्वाती राजे यांनी सांगितले.तांबे म्हणाले, ‘‘विज्ञान प्रयोग, विज्ञान भय, पर्यावरण असे वेगळे आशय असणारे साहित्य मुलांना वाचायला मिळाले, तर यामध्ये सकसता येईल. तसेच जी मुले नव्याने लिहीत आहेत, त्यांच्यासाठी कार्यशाळा घेऊन त्यांना काय लिहिण्यापेक्षा कसे लिहावे, हे शिकविले पाहिजे. बालरंगभूमीमध्ये सकसता आहे की नाही या विषयावर चर्चा करताना, त्यांचे तंत्र काय, याचा अभ्यास केला पाहिजे, यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.