शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर जन्मदात्याचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2016 03:20 IST

१५ वर्षांच्या आपल्याच मुलीला शीतपेयातून मद्य पाजून तिच्यावर अत्याचार करून तिला गरोदर ठेवणाऱ्या ४५ वर्षीय पित्याला काशिमीरा पोलिसांनी अटक केली

मीरा रोड : जेमतेम १५ वर्षांच्या आपल्याच मुलीला शीतपेयातून मद्य पाजून तिच्यावर अत्याचार करून तिला गरोदर ठेवणाऱ्या ४५ वर्षीय पित्याला काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे न्यायालयाने त्याला ३० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या अल्पवयीन मुलीची सावत्र आई घर सोडून गेल्याने ती बिगारी काम करणारे वडील व ६ वर्षांच्या लहान बहिणीसह राहत होती. मद्यपान करणाऱ्या बापाने शीतपेयातून तिला मद्य पाजले. गुंगीत असताना त्याने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. त्यानंतर, तो आपल्या दोन्ही मुलींना घेऊन कामासाठी नाहूर येथे गेला. तेथे मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला केईएम रुग्णालयात नेले असता तिला दिवस गेल्याचे निष्पन्न झाले. तेथे तिचा गर्भपात करण्यात आला. मात्र, रुग्णालयाने ही बाब पोलिसांना कळवल्यानंतर प्रकरण काशिमीरा पोलीस ठाण्यात चौकशीकरिता वर्ग केले गेले.२ मे रोजी बलात्कार व बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला. मुलीने चौकशीत वायरमन अतुल सहानी याने बलात्कार केल्याची बतावणी केली. पोलिसांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याने पुढे फारसा तपास झाला नाही. वरिष्ठ निरीक्षक विलास सानप यांनी प्रलंबित गुन्ह्याचा तपास करण्यास निरीक्षक धनाजी कलंत्रे यांना सांगितल्यावर १७ आॅगस्टपासून तपासाला वेग दिला. त्या वेळी पीडिता वडिलांसह दादरजवळील नायगाव येथे एका बांधकाम साइटवर राहत असल्याचे पोलिसांनी शोधून काढले. पोलिसांनी मुलीला विश्वासात घेतले असता वडिलांनीच बलात्कार केल्याची धक्कादायक कबुली तिने दिली. (प्रतिनिधी)