शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

मूल होत नसल्याने चिमुकलीचे अपहरण

By admin | Updated: April 25, 2015 09:43 IST

मातृत्वाची ओढ लागलेल्या पण पदरा मूल नसल्यामुले निराश झालेल्या एका महिलेने चार महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून आपली मुलगी म्हणून घरी नेल्याची घटना मुंबईत घडली.

 महिलेस अटक : चोवीस तासांत तपास

मुंबई : मातृत्वाची ओढ लागलेल्या पण पदरा मूल नसल्यामुले निराश झालेल्या एका महिलेने चार महिन्यांच्या मुलीचे अपहरण करून आपली मुलगी म्हणून घरी नेल्याची घटना मुंबईत घडली आहे.  मात्र मुलगी गायब झाल्याची तक्रार पालकांनी नोंदवल्यानंतर पोलिसांनी अवघ्या २४ तासांतत्या मुलीला शोधण्यात यश मिळवले असून आरोपी महिलेला अटक केली.२३ एप्रिल रोजी रात्री कल्याण येथे राहणारे अब्दुल करीम हे आपली पत्नी आणि दोन लहान मुलींसह सीएसटी स्थानकाच्या मेन लाइन हॉल येथे झोपले असता त्याच्या चार महिन्यांच्या अरीजा या मुलीला पळवून नेण्यात आले. सकाळी याची माहिती त्यांनी तत्काळ सीएसटी रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर शोध घेण्याचे काम रेल्वे पोलिसांकडून सुरू करण्यात आले. सीसीटीव्ही फूटेज तपासल्यावर सीएसटी स्टेशन येथे येणार्‍या टॅक्सीतून एका महिलेने या मुलीला नेल्याचे समजले. त्यानंतर टॅक्सीचालकाकडे चौकशी केली असता मानखुर्द येथे एका महिलेला लहान मुलासह सोडल्याचे चालकाने सांगितले. ज्या ठिकाणी महिलेला सोडले त्या ठिकाणी अनेक इमारती असल्याने तिचा शोध घेणे जिकिरीचे काम होते. मात्र पोलिसांनी प्रत्येक रूमची तपासणी केल्यानंतर एक महिला प्रसूत झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या महिलेच्या घरात जाऊन पोलिसांनी चौकशी केली. महिला आरोपीने तिला मुलगा झाला असून, तो पाळण्यात झोपल्याचे सांगितले. त्याची पोलिसांनी खात्री केली असता तो मुलगा नसून मुलगी असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर सखोल चौकशी केली असता आरोपी महिलेकडून गुन्ह्याची कबुली देण्यात आली. या घटनेचा रेल्वे पोलिसांनी २४ तासांत छडा लावल्याचे जीआरपी आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी सांगितले. ही कारवाई पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उप आयुक्त रूपाली अंबुरे, सीएसटी स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी शिंदे, पोलीस निरीक्षक माणिक साठे, पोलीस निरीक्षक योगेंद्र पाचे, पोलीस हवालदार गावकर, पोलीस शिपाई साळवी, पोलीस शिपाई हिरनाक यांच्यासह अन्य पोलिसांनी केली. (प्रतिनिधी) गरोदर असल्याचे भासवून पतीला फसवत होतीनऊ महिने गरोदर असल्याचे भासवून महिला आरोपी आपल्या पतीलाही फसवत होती. ही महिला पोटाला पट्टे बांधून गरोदर असल्याचे पतीला भासवत होती. सीएसटी येथून चार महिन्यांच्या मुलीला पळवून नेल्यानंतरही पतीला व तिच्या शेजार्‍यांना मुलगा झाल्याचे सांगून त्याबाबत विधी करून जेवणावळही आयोजित केली होती, असे जीआरपी आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी सांगितले. पळवून नेण्यात आलेल्या मुलीला २४ तासांमध्ये शोधण्याची कामगिरी पोलिसांनी केली.