शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘बालहक्क’ एकतर्फी!

By admin | Updated: July 18, 2014 03:01 IST

बारा वर्षांखालील बालगोविंदांना दहीहंडीच्या थरावर चढविल्यास दहीहंडी उत्सव मंडळांवर बालहक्क समितीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत

मुंबई : बारा वर्षांखालील बालगोविंदांना दहीहंडीच्या थरावर चढविल्यास दहीहंडी उत्सव मंडळांवर बालहक्क समितीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. मात्र हा निर्णय एकतर्फी घेण्यात आल्याची टीका दहीहंडी मंडळांकडून करण्यात येत असून, याबाबत आयोजकांनी मात्र सावध भूमिका बाळगली आहे.बालहक्क समितीने घेतलेला हा निर्णय एकतर्फी असून, याबाबत गोविंदा पथकांची बाजूच ऐकण्यात आलेली नाही. बालहक्क समितीला जेवढी बालगोविंदांची काळजी आहे, त्याप्रमाणेच गोविंदा पथकेही बालगोविंदांच्या सुरक्षेचा विचार नेहमीच करतात. शिवाय, या उत्सवाच्या माध्यमातून बालगोविंदांना वेगळीच प्रेरणा मिळते. मात्र याविषयी, बालहक्क समितीशी आम्ही वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही आमची बाजू न ऐकताच हा निर्णय घेण्यात आल्याचे माझगाव दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे प्रशिक्षक अरुण पाटील यांनी सांगितले.दहीहंडी उत्सवापूर्वी पुन्हा एकदा या मुद्द्यावर सर्व गोविंदा पथकांची बैठक घेण्यात येईल. त्यानंतर या बैठकीत चर्चा करून गोविंदा पथके त्यांची भूमिका स्पष्ट करतील. दहीहंडी समन्वय समितीच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात येईल. त्याचबरोबर पुन्हा एकदा गोविंदा पथकांची बाजू शासनाला समजावून सांगण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील. मात्र या निर्णयामुळे दहीहंडी उत्सवाच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेला गालबोट लागले आहे, असे मत श्री दत्त गोविंदा पथकाचे प्रशिक्षक बाळा पडेलकर यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)