शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बालमृत्यूंची गंभीर दखल

By admin | Updated: September 24, 2016 03:00 IST

राज्यभर खळबळ माजली असताना या गंभीर प्रश्नावर सरकारच्या असंवेदनशील धोरणाची सर्वत्र नाचक्की होत आहे.

पालघर : जिल्ह्यातील ६०० बालमृत्यूंबाबत राज्यभर खळबळ माजली असताना या गंभीर प्रश्नावर सरकारच्या असंवेदनशील धोरणाची सर्वत्र नाचक्की होत आहे. उच्च न्यायालयापाठोपाठ राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानेही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाने याबाबत राज्य शासनाला नोटीस बजावून या बालमृत्यूच्या धक्कादायक आणि लक्षणीय संख्येबाबत जाब विचारला आहे. मयत बालकाच्या घरी उशिरा भेट देणारे पालघरचे पालकमंत्री आणि आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांना कुपोषित बालकाच्या आईने भेटण्यास विरोध दर्शवला होता. याच दरम्यान, सवरा यांनी ६०० बालकांच्या मृत्यूबाबत वादग्रस्त विधान केले होते. या वाढत्या बालमृत्यूंबाबत आधी उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त करीत प्रत्येक बाबतीत न्यायालयाच्या आदेशाची वाट बघू नका, असे सांगून सरकारवर ताशेरे ओढले होते. गुरुवारी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने या बालमृत्यूंची गंभीर दखल घेऊन सरकारला जाब विचारल्याचे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडितांनी सांंगितले.कुपोषणासोबतच रोजगारनिर्मिती आणि स्थलांतर रोखण्यासाठी श्रमजीवी संघटना फिल्डवर युद्धपातळीवर काम करत असून आता याबाबत न्यायालयात आणि आयोगाकडेही सरकारची असंवेदनशीलता सिद्ध करण्यासाठी संघटना पुढे असेल, असे पंडित यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी) >अहवाल सादर कराया प्रकरणात आता न्यायालयात आणि मानवी हक्क आयोगातही श्रमजीवी संघटना सहभागी होणार असून सरकारची असंवेदनशीलता आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी या केसमध्ये आदिवासी जनतेची बाजू श्रमजीवी मांडणार असल्याचे संघटनेचे विवेक पंडित यांनी सांगितले. कुपोषण निर्मूलनासाठी सरकार तत्कालीन आणि दीर्घकालीन कोणत्या उपाययोजना करतेय आणि करणार आहे, याबाबत स्वयंस्पष्ट अहवाल सादर करावा, असे निर्देश मानवी हक्क आयोगाने सरकारला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.