शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गडचिरोलीत बालमृत्यू वाढले

By admin | Updated: December 1, 2015 03:28 IST

बालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन कार्यक्रम आखून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. तरीही गेल्या चार वर्षांत बालमृत्यू रोखण्यात शासनाला म्हणावे तितके यश आलेले नाही.

- सुमेध वाघमारे,  नागपूरबालमृत्यू रोखण्यासाठी शासन नवनवीन कार्यक्रम आखून त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करीत आहे. तरीही गेल्या चार वर्षांत बालमृत्यू रोखण्यात शासनाला म्हणावे तितके यश आलेले नाही. आरोग्य सेवा, नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या सहा जिल्'ात एक ते पाच वर्षे वयोगटातील बालमृत्यूमध्ये केवळ १३.२८ टक्के घट झाली आहे. मात्र, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्'ात शून्य ते एक वर्षांतील बालमृत्यूंमध्ये वाढ झाल्याचे धक्कादायक चित्र आहे.शासनाने बालमृत्यू कमी करण्यासाठी नवसंजीवनी योजना, जननी सुरक्षा योजना, जेएसएसके योजना, १०८ अ‍ॅम्ब्युलन्सची सेवा, मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत लसीकरणाची सेवा, ग्रामीण स्वास्थ मिशन, एनएचएम अंतर्गत मोबाइल मेडिकल युनिट सेवा व मानवविकास कार्यक्रम कार्यान्वित आहेत. यात गर्भवती मातांना अनुदान, त्यांची तपासणी, स्तनदा मातांची तपासणी व शून्य ते सहा महिने बालकांची मोफत तपासणी, औषध व प्रवासही दिला जातो. यावर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत, असे असतानाही अपेक्षित यश मिळत नसल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.२०६६ बालमृत्यूू- आरोग्य सेवा मंडळ, नागपूर अंतर्गत नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा हे सहा जिल्हे येतात. शून्य ते एक वर्ष वयोगटात २०११-१२मध्ये भंडाऱ्यात ३८१, गोंदियात ४३६, चंद्रपूरात ७०२, गडचिरोलीत ४२६, वर्धेत ३८२ तर नागपूर जिल्'ात २४० असे मिळून २५६७ बालकांचा मृत्यू झाला. याच्या तुलनेत २०१४-१५मध्ये भंडाऱ्यात ४३४, गोंदियात ४८५, चंद्रपूरमध्ये १५०, गडचिरोलीत ५९८, वर्धेत २२५ तर नागपूर जिल्'ात १७४ असे मिळून २०६६ बाल मृत्यू झाले आहेत. यात चंद्रपूर, वर्धा व नागपुरात बालमृत्यूदर कमी झाला असला तरी गडचिरोली, गोंदिया व भंडारा जिल्'ात तो वाढला आहे.जिल्हानिहाय बालमृत्यूजिल्ह्याचे नाव२०११-१२२०१२-१३२०१३-१४२०१४-१५भंडारा३८१५१८४५३४३४गोंदिया४३६४२२५१७४८५चंद्रपूर ७०२६०९४५११५०गडचिरोली४२६५८७५१२५९८वर्धा३८२३५५२६३२२५नागपूर २४०१६११२९१७४