शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

बालकाने रचला स्वत:च्या अपहरणाचा डाव

By admin | Updated: November 22, 2014 12:13 IST

टीव्हीवरील गुन्हेगारीविषयक मालिका पाहून औरंगाबादमधील एका ११ वर्षीय बालकाने स्वत:च्या अपहरणाचा डाव रचल्याचे ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणले.

ठाणे : टीव्हीवरील गुन्हेगारीविषयक मालिका पाहून औरंगाबादमधील एका ११ वर्षीय बालकाने स्वत:च्या अपहरणाचा डाव रचल्याचे ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणले. त्याच्यासह औरंगाबाद सोडणाऱ्या १३ वर्षीय साथीदाराचा शोध सुरू आहे.गरीब कुटुंबातील प्रेम गुडे (११) आणि विठ्ठल कुबेर (१३) अशी या मुलांची नावे असून ते औरंगाबादच्या मुकुंदवाडी परिसरातील ज्ञानेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी आहेत. प्रेम हा सहावीत तर विठ्ठल दहावीत शिकतो. दोघे मंगळवारी शाळेत जाण्याच्या वेळेस घरातून निघाले. पण शाळेत न जाता रेल्वेने ते नाशिकला आले. दोन दिवस नाशिकला राहिल्यानंतर गुरुवारी दोघेही मुंबईत आले.कुर्ला रेल्वे ट्रॅक वर फिरताना रेल्वे पोलिसांनी त्यांना हटकले. त्यामुळे दोघांची चुकामूक झाली. प्रेम हा अंबरनाथला आला. तेथे तो चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या छाया चोपडे यांना सापडला. त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला, चौघांनी आपले अपहरण करून मुंबईला आणले आणि त्यांची नजर चुकवून तेथून पळ काढल्याचे, सांगितले़ मात्र, अधिक विचारणा केल्यावर त्याने इंग्लिशच्या शिक्षिका मारतात, असे उत्तर दिले. त्यामुळे काहीतरी बनाव असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यांनी समुपदेशनाचा मार्ग अवलंबून सत्य बाहेर काढले मित्रासोबत आपण पळून आलो असून कुठे हरवल्यास पुन्हा नाशिकला भेटू, असे त्याने मित्राला सांगितल्याची माहिती त्याने दिली. हा बनाव मालिकांमधील काही दृश्ये पाहून रचल्याची कबुली त्याने दिली. (प्रतिनिधी)