शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘बाल लैंगिक शोषण रोखण्यासाठी समित्या स्थापणार’, राज्य बालहक्क आयोगाची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 04:04 IST

मुंबई : बाल लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी, सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभर ग्राम आणि नगर स्तरावरील बाल संरक्षण समितींची स्थापना केली जाईल, तसेच बालकांच्या समस्यांबाबत जागृती वाढविण्यासाठी प्रशिक्षण आणि सशक्तीकरणाची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती, राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी ...

मुंबई : बाल लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी, सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यासाठी राज्यभर ग्राम आणि नगर स्तरावरील बाल संरक्षण समितींची स्थापना केली जाईल, तसेच बालकांच्या समस्यांबाबत जागृती वाढविण्यासाठी प्रशिक्षण आणि सशक्तीकरणाची मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती, राज्य बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे यांनी दिली.येथील सेंट अँड्र्युज शाळेच्या सभागृहात सोमवारी बाल अत्याचारमुक्त भारत अभियानाच्या शुभारंभप्रसंगी घुगे बोलत होते. देशातील प्रत्येक दुसºया बालकासोबत अत्याचाराची घटना घडत असते. विविध स्वयंसेवी संस्था, वर्ल्ड व्हिजन इंडिया (डब्लूव्हीआय) आणि बालहक्क आयोगाच्या माध्यमातून, २०२१ पर्यंत बाल लैंगिक गुन्हेगारी आणि शोषणाच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राष्ट्रव्यापी मोहिमेची घोषणा केली आहे. घुगे म्हणाले की, बाल लैंगिक गुन्हेगारी थांबविण्याच्या प्रयत्नात समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे. बाल लैंगिक अत्याचारांविरोधात जागृती निर्माण होत असल्यानेच, या प्रकरणातील गुन्ह्यांची नोंद करण्यासाठी लोक पुढे येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.