शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांपासून मुलांना केले कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2017 04:00 IST

तीन लहान मुलांना रिक्षाचालक बापाने सहा वर्षापासून आपल्या घरातच कैद करून अज्ञातवास घडविल्याचे प्रकरण माजी नगरसेविकेने उघडकीस आणले

भिवंडी : खेळण्याबागडण्याचे वय असलेल्या तीन लहान मुलांना रिक्षाचालक बापाने सहा वर्षापासून आपल्या घरातच कैद करून अज्ञातवास घडविल्याचे प्रकरण माजी नगरसेविकेने उघडकीस आणले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.शहरातील कोटरगेट मशिदीसमोर असलेल्या लंबीचाळमध्ये शफिक मोमीन आपल्या परिवारासह राहत होता. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तो तिला मारहाण करीत असल्याने त्याच्या जाचाला कंटाळून २०१० मध्ये त्याची पत्नी सोडून गेली, तेव्हापासून त्याने या तीन मुलांचा समाजाशी संपर्क होऊ नये म्हणून त्यांना शाळेत जाण्यास मनाई केली. त्यांना घरातच बंदी बनवून ठेवले. रात्रंदिवस घरासमोर रहदारी सुरू असतानाही या मुलांची घराबाहेर पडण्याची हिंमत झाली नाही. गेल्या महिन्यापासून याबाबतची माहिती माजी नगरसेविका रूख्साना कुरेशी यांना मिळाली होती. त्यांनी सर्व माहिती घेत परिसरातील नागरिकांना सोबत बुधवारी रात्री १२ च्या सुमारास घरात घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या मुलांची सुटका केली. त्यांना उपचारासाठी इंदिरा गांधी रूग्णालयात दाखल केले. रेय्यान (१५), अय्यन (१३), मोहम्मद (१०) अशी या मुलांची नावे आहेत. त्यांचे शिक्षणही सहा वर्षापासून बंद करून खुराड्याप्रमाणे असलेल्या खोलीत डांबून ठेवले होते. त्यापैकी मोठा मुलगा रेय्यान याचा पाय एक महिन्यापूर्वी फ्रॅक्चर झाला. त्याच्या पायावर प्लास्टर करण्यात आले. तसेच छोटा मुलगा मोहम्मदही लंगडत असल्याने त्यांचे एक्स-रे काढले आहेत. मात्र फ्रॅक्चर कशामुळे झाले हे त्यांनी सांगितले नाही. इंदिरा गांधी रूग्णालयातील डॉक्टरांनी मुले घाबरलेल्या स्थितीत असून त्यांची स्थिती बापाच्या विरोधात बोलण्यापलिकडे आहे. तसेच त्यांच्या शरीरात रक्ताची-कॅल्शियमची कमतरता असल्याचे सांगितले.या प्रकरणी कुरेशी यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलीस जबाब नोंदवत आहे. मात्र अद्याप बापाविरूद्ध गुन्हा दाखल केलेला नाही. या घटनेविरोधात परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.(प्रतिनिधी)>पत्नी पळवेल ही भीतीतिन्ही मुलांना पत्नी पळवून नेईल या भीतीने त्यांना घरात ठेवल्याचे शफीक मोेमीन याने कबूल केले. यामुळे मुलांना शाळेत किंवा बाहेर पाठविले नसल्याचे सांगितले.