शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चिक्कीवरून विधानसभेत गदारोळ

By admin | Updated: March 17, 2016 04:06 IST

विधानसभेत पुन्हा चिक्की घोटाळ्यावरून गदारोळ झाला. या गदारोळात विरोधी पक्षांच्या काही सदस्यांबद्दल केलेले अवमानकारक विधान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मागे घेणे भाग पडले.

मुंबई : विधानसभेत पुन्हा चिक्की घोटाळ्यावरून गदारोळ झाला. या गदारोळात विरोधी पक्षांच्या काही सदस्यांबद्दल केलेले अवमानकारक विधान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना मागे घेणे भाग पडले. प्रश्नोत्तराच्या तासात काँग्रेसचे अमिन पटेल आणि इतर सदस्यांनी आदिवासी विभागातील शाळांमध्ये निकृष्ट चिक्कीचा पुरवठा केल्याचा आरोप करीत प्रश्न उपस्थित केला होता. चिक्की निकृष्ट असूनही कंत्राटदाराविरुद्ध काहीच कारवाई का केली नाही, उच्च न्यायालयात सरकारने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले आहे, अशा प्रश्नांचा भडिमार विरोधी पक्ष सदस्यांनी केला. आपण यापूर्वी वारंवार चिक्कीविषयी सभागृहात सविस्तर माहिती दिली आहे. तरीही हा प्रश्न का येतो माहिती नाही, असे सांगत पंकजा मुंडे यांनी आणखी पाच वर्षेही या विषयावर प्रत्युत्तर देण्याची आपली तयारी असल्याचे सांगितले. त्यातच विरोधी पक्षांच्या सदस्यांबद्दलच्या त्यांनी केलेल्या उल्लेखावरून गदारोळ झाला. त्यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील आदींनी केली. (विशेष प्रतिनिधी)चिक्कीत काहीही निकृष्ट नव्हते...भाजपाचे अनिल गोटे हे मुंडे यांच्या मदतीला धावले. न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहिती सभागृहाला देणे नियमानुसार बंधनकारक नाही, असे त्यांनी म्हणताच विरोधक आक्रमक झाले.भाजपा आणि विरोधी सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच पंकजा यांनी, चिक्की खाण्यायोग्य असल्याचा अहवाल गाजियाबादच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेने दिलेला आहे. चिक्कीत काहीही निकृष्ट नव्हते.अहमदनगर जिल्ह्यात एक तक्रार आली म्हणून आम्ही पुरवठा थांबविला. प्रत्यक्षात तेथे वाटप सुरूच व्हायचे होते, असे त्या म्हणाल्या. गदारोळ सुरू असतानाच प्रश्नोत्तराचा तास संपला.