ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. १५ - गोव्याचे पोलिस महानिरीक्षक (आयजीपी) सुनील गर्ग यांनी तक्रार नोंद करून घेण्यासाठी दक्षिण गोव्यातील व्यवसायिक मुन्नालाल हलवाई यांच्याकडून पाच लाख रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाची चौकशी गोव्याचे मुख्य सचिव आर.के.श्रीवास्तव करतील असे मुख्यमंत्री ललक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी येथे जाहीर केले.
हलवाई यांनी आरोप करताना पुरावा म्हणून ध्वनीमुद्रणाची सीडीही सादर केली आहे. तसेच लोकायुक्तांकडेही तक्रार सादर केली आहे.
पत्रकारांनी मुख्यमंत्री पार्सेकर यांना सोमवारी विचारले असता ते म्हणाले की आरोपाची दखल आपण घेतली असून मुख्य सचिवांना चौकशी करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, श्रीवास्तव हे अतिशय ज्येष्ठ आयएएस अधिकारी असून तेच गृह सचिवही आहेत. आयजीपी पदावरील व्यक्तीवर एवढा गंभीर आरोप प्रथमच झाला आहे.
(खास प्रतिनिधी)