शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

मुख्यमंत्र्यांचा मंगळवारपासून पाहणी दौरा

By admin | Updated: August 30, 2015 02:46 IST

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील दुष्काळी भागाचा एक सप्टेंबरपासून दौरा करणार असून, चारा छावण्या व पाण्याच्या टँकरचे नियोजन झाले. सरकार पैशांची कोणतीही

लोणी/अहमदनगर : मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील दुष्काळी भागाचा एक सप्टेंबरपासून दौरा करणार असून, चारा छावण्या व पाण्याच्या टँकरचे नियोजन झाले. सरकार पैशांची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र चारा छावण्या नेत्यांसाठी कुरण ठरू नये, एवढीच अपेक्षा असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. कृषी विभाग व प्रवरा औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक समूहातर्फे प्रवरानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी दिन, विविध पुरस्कार वितरण तसेच शहरात पालकमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.फडणवीस म्हणाले, की राज्य दुष्काळात सापडले आहे. सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, त्यासाठी दौरा करणार आहे. सरकारने वर्षभरात शेतकऱ्यांना ७ हजार कोटींची मदत केली. मात्र त्यातून शेतकरी समृद्ध होत नाही. त्यासाठी राज्य दुष्काळमुक्त करणे, ही आपली दिशा असली पाहिजे. जलयुक्त शिवार योजना त्यासाठीच हाती घेतली आहे. योजनेतून पाणलोटाचा विकास करीत विकेंद्रित पाण्याचे साठे तयार केले जात आहेत. डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी हे ७० च्या दशकातच ओळखले होते. केटीवेअरसारख्या योजनांतून त्यांनी सहकार उभा केला, मात्र आघाडी सरकारने दिशा बदलली ते मोठ्या धरणांच्या मागे लागले. धरण पूर्ण झाले की भरण होत नाही, म्हणून धरणे पूर्ण होऊ दिली नाहीत, अशी टीकाही त्यांनी आधीच्या सरकारवर केली. ३०० कोटींची जलयुक्त शिवारची कामे जनतेने स्वत:च्या पैशांतून केली. स्वातंत्र्योत्तर काळात असे प्रथमच घडल्याचा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)खोऱ्यांतील पाण्याचे नियोजन : खोऱ्यांचा उपखोरेनिहाय अभ्यास केला जाईल. त्यातून अधिकचे पाणी उपलब्ध करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. २००४ मध्ये जलसंपत्ती नियमन आयोग झाला. मात्र त्याची पहिली बैठक मी मुख्यमंत्री झाल्यावर घेतली, एवढे जलनियोजनाकडे गेल्या काही वर्षांत दुर्लक्ष झाल्याचे ते म्हणाले. आम्ही राजकीय विरोधक, शत्रू नव्हे!लोकशाहीत आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक आहोत, शत्रू नव्हे, अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना लोणी येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. विखे यांच्या भाजपा प्रवेशाची शंकाही व्यक्त झाली. चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न फडणवीस आणि विखे यांनी केला.ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की समाजकारण व राजकारणात जी अस्पृश्यता वाढत चालली आहे, ती भयंकर आहे. आरक्षणापेक्षा सध्या दुष्काळाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. दुष्काळातून माणसे वाचली तर आरक्षणाचा मुद्दा येईल. मराठवाड्याचा दुष्काळ राजकीय असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.