शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा तोडगा : चंद्रकांतदादांचा फसलेला फॉर्म्युला, रस्त्यांचे ‘अ‍ॅन्युईटी’ निकष बदलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 02:52 IST

सरकार व खासगी कंत्राटदारांच्या ‘हायब्रिड अ‍ॅन्युईटी’ने १० हजार किलोमीटरचे रस्ते ३२ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आधी ठरविलेल्या फॉर्म्यूल्याला कंत्राटदारांनी पूर्णत: पाठ दाखविल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात हस्तक्षेप करीत हा फॉर्म्यूला बदलला आहे.

यदु जोशी मुंबई : सरकार व खासगी कंत्राटदारांच्या ‘हायब्रिड अ‍ॅन्युईटी’ने १० हजार किलोमीटरचे रस्ते ३२ हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने आधी ठरविलेल्या फॉर्म्यूल्याला कंत्राटदारांनी पूर्णत: पाठ दाखविल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात हस्तक्षेप करीत हा फॉर्म्यूला बदलला आहे.राज्य सरकारने ४० टक्के निधी द्यावा आणि कंत्राटदार कंपन्यांनी आपल्या खिश्यातून ६० टक्के निधी द्यावा. राज्य सरकार कंत्राटदारांना त्यांचा पैसा १५ वर्षांत परत करेल, असे आधी ठरले होते. मात्र, या फॉर्म्यूल्यानुसार काम करण्यास कुठल्याही कंपनीने उत्सुकता दाखविली नाही. त्यावर अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेऊन काही बदल करण्याचे आदेश दिले.आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार, राज्य सरकारचा वाटा ६० टक्के असेल आणि कंत्राटदार हे ४० टक्के आर्थिक भार उचलतील. कंत्राटदार दोन वर्षांत आपला हिस्सा देतील, त्याची परतफेड राज्य सरकार नंतरच्या दहा वर्षांमध्ये करेल. दर सहा महिन्यांनी ही परतफेड करण्यात येणार आहे. आधी ती दरवर्षी करण्यात येणार होती. या शिवाय, आधी एक काम किमान १०० किलोमीटरचे असेल असे ठरले होते आता ते ५० किलोमीटर करण्यात येणार असून या बदलास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता लवकरच घेण्यात येणार आहे. आधी कंत्राटदारांच्या प्रतिसादाअभावी फसलेल्या या योजनेला आता फॉर्म्यूला बदलल्याने गती मिळण्याची अपेक्षा आहे.रक्कम कर्जरोख्याने-‘हायब्रिड अ‍ॅन्युईटी’द्वारे राज्यातील १० हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्यात येणार आहेत. त्यावर ३२ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी राज्य शासनाचा सुरुवातीचा सहभाग म्हणून ७ हजार ५०० कोटी रुपये कर्जरोख्यांच्या रुपाने उभारण्यात येणार आहेत.पुलांसाठी १६०० कोटी रु.राज्यातील पुलांची देखभाल, दुरुस्ती व पुनर्बांधणी यावर १६०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. ही रक्कम हुडकोकरून कर्जरुपाने घेण्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मान्यता देण्यात आली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसchandrakant patilचंद्रकांत पाटील