शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या संपाबाबत मुख्यमंत्र्यांचे मौन

By admin | Updated: June 1, 2017 18:24 IST

राज्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर गेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या या संपाबाबत मौन बाळगत लोणावळ्यातून काढता पाय घेतला.

ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. 01 -  राज्यातील शेतकरी विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर गेला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकर्‍यांच्या या संपाबाबत मौन बाळगत लोणावळ्यातून काढता पाय घेतला. 
लोणावळा नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनाकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी लोणावळ्यात आले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांचा संप व कर्जमाफी या प्रश्नांबाबत चकार शब्द सुद्धा काढला नाही. लोणावळा शहराला महाराष्ट्रातील महत्वाचे व पर्यावरण पुरक शहर करण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देत मुख्यमंत्री म्हणाले, मागील आठ वर्षांपासून रखडलेली नगरपरिषदेची इमारत ज्या गतिमानतेने तुम्ही पुर्ण केली. त्याच गतिमानतेने प्रशासन चालवून सामान्य नागरिकांना मदत होईल, असे काम करा. 
लोणावळ्याच्या पाणीपुरवठा योजनेकरिता 34 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. येथील नगरपरिषद रुग्णालय, बहुमजली पार्किंग, तलाव, रोप वे आदी कामांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मार्गी निधी कमी पडू दिला जाणार नाही. पर्यावरण पुरक शहरे ही पर्यटकांचे नंदनवन आहे, ते सौंदर्य न राहिल्यास पर्यटक दुसर्‍या जागा शोध घेतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. याचबरोबर लोणावळा शहराचे महत्व वाढवत शहराला स्वच्छ व सुंदर बनवा, यासाठी राज्य सरकार तुमच्या पाठिशी आहे, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना दिला.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय तथा बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मुख्याधिकारी सचिन पवार आदी मान्यवर उपस्थित होते.