शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सर्किट बेंचच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांची सही

By admin | Updated: April 3, 2015 07:51 IST

चंद्रकांतदादा पाटील यांची माहिती : कोल्हापूरचा टोल रद्द करणारच..!

कोल्हापूर : कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही झाली असून, लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. कोल्हापूर टोलमुक्त करण्याची बांधीलकी आमची आहे. मूल्यांकन झाले की, ‘आयआरबी’ला कसे पैसे द्यायचे याचे नियोजन झाले असून, लवकरच हा निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.सर्किट बेंचच्या प्रस्तावावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सही केली असून, हा प्रस्ताव कॅबिनेटपुढे नेण्यासाठी स्वत: पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे हाही प्रश्न मार्गी लागण्यास काहीच अडचण वाटत नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. शासनाने हा प्रस्ताव मंजूर केल्यानंतर तो उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे पाठविला जातो. सरकारने या प्रस्तावास मंजुरी देणे हा यातला महत्त्वाचा टप्पा मानला जातो. कारण सरकारने घेतलेला निर्णय न्याय यंत्रणेवर बंधनकारक असतो. त्यामुळे सर्किट बेंच स्थापन होण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडल्याचे स्पष्ट झाले. सर्किट बेंच स्थापन करण्यासंबंधीच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी न्यायालयाने न्यायाधीश सोनक, हरदास व रणजित मोरे यांची त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही. तो अहवाल आल्यानंतर प्रत्यक्ष बेंच सुरू होण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू होऊ शकेल.मंत्री पाटील म्हणाले, टोलची दरवाढ करारानुसार झालेली आहे. पूर्वीच्या सरकारने जो करार केला होता, त्यानुसार दरवाढ झाली असून, जोपर्यंत टोल रद्द होत नाही तोपर्यंत कराराप्रमाणे ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. टोल रद्द करण्याचे वचन आम्ही कोल्हापूरच्या जनतेला दिलेले आहे. आम्ही त्याच्याशी बांधील असून, प्रकल्पाच्या मूल्यांकन समितीच्या खर्चाचा अहवाल आल्यानंतर गतीने हा प्रश्न मार्गी लावू. याबाबत आमदार चंद्रदीप नरके व आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात विषय ताणून धरला होता. यावर बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी समिती गतीने काम करीत असून, थोड्याच दिवसांत मूल्यांकनाचा अहवाल प्राप्त होईल, असे सांगितले आहे. या अधिवेशनातच हा प्रश्न निकालात काढणार होतो; पण अधिवेशन येत्या चार-पाच दिवसांत संपणार असल्याने लवकरच हा प्रश्न सोडवू, हेच या प्रश्नाचे व्यावहारिक उत्तर होईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. अधिवेशनाचे कामकाज चांगले झाले असून, विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झालेली आहे. विरोधकांच्या आग्रहाखातर एक आठवडा अधिवेशनाचा कालावधी वाढविला. महत्त्वाचे सेवा हमी विधेयक सोमवारी (दि. ६) चर्चेसाठी येणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. यावेळी महेश जाधव, बाबा देसाई, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)