शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

‘क्लस्टर’ लागू करण्यात मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचा अडसर

By admin | Updated: September 21, 2016 04:02 IST

ठाणे जिल्ह्यात ८२ टक्के बांधकामे ही बेकायदा आहेत. क्लस्टर योजना लागू करण्याआधीच जास्तीचा एफएसआय वापरण्यात आला

कल्याण : ठाणे जिल्ह्यात ८२ टक्के बांधकामे ही बेकायदा आहेत. क्लस्टर योजना लागू करण्याआधीच जास्तीचा एफएसआय वापरण्यात आला आहे. आता जर विकास करायचा असेल, तर आठ एफएसआय द्यावा लागेल. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेकायदा बांधकामे नियमित करण्याची घोषणा ही पोकळ आणि अशक्यप्राय असल्याची टीका माजी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी कल्याण, कांबा येथील मेळाव्यांत केली.या वेळी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, माजी आमदार गोटीराम पवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सारिका गायकवाड, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, कल्याण पश्चिमेचे अध्यक्ष संदीप देसले, नगरसेवक जव्वाद डोण, कुणाल पाटील, माजी नगरसेवक उमेश बोरगावकर, ग्रामीणचे नेते अर्जुन चौधरी, वंडार पाटील आदी उपस्थित होते. नाईक म्हणाले की, ‘बांधकामे नियमित करण्याचा निर्णय एखादा ग्रामपंचायतीचा सरपंचही घेणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री असा निर्णय घेतात, हे हास्यास्पद आहे. भाजपाने केवळ थापा मारल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थापाडे आहेत. त्यांचाच कित्ता राज्याचे मुख्यमंत्री गिरवत आहेत. मोठागाव ठाकुर्ली ते माणकोली आणि कोन ते दुर्गाडी या पुलांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी केले असले तरी त्याला मंजुरी आघाडी सरकारने दिली होती. आम्ही केलेल्या कामांची भूमिपूजने भाजपा करत आहे. पालकमंत्री असताना मी कामे केली नाहीत, असा भाजपाचा आरोप चुकीचा असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे सरकार ड्युप्लिकेट सरकार आहे.’ ‘नवी मुंबई महापालिकेचा कारभार स्वच्छ आहे. ही महापालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे या महापालिकांत शिवसेनेची सत्ता आहे. त्याला भाजपाची साथ आहे. आमच्या पालिकेतील कारभाराची चौकशी करायची असेल, तर शिवसेना-भाजपाच्या ताब्यातील महापालिकांची अगोदर चौकशी करण्यात यावी आणि त्यासाठी एसआयटी नेमण्यात यावी. त्याचे आॅडिट करावे,’ या मागणीचा पुनरूच्चार नाईक यांनी केला. >पंतप्रधान मोदींवर टीकाभाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारत-पाकमध्ये एक लहानचे युद्ध घडवून आणतील. त्याचा वापर निवडणुकीत करतील, असाही आरोप नाईक यांनी केला.