शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री तोडगा काढणार?

By admin | Updated: May 13, 2016 01:27 IST

शहराची मेट्रो, २४ तास पाणीपुरवठा, जायका, कचरा प्रकल्पाची जागा, विकास आराखडा यांसह अनेक महत्त्वाचे प्रश्न अनेक दिवसांपासून रखडले आहेत.

पुणे : शहराची मेट्रो, २४ तास पाणीपुरवठा, जायका, कचरा प्रकल्पाची जागा, विकास आराखडा यांसह अनेक महत्त्वाचे प्रश्न अनेक दिवसांपासून रखडले आहेत. यावर अनेकदा बैठका होऊन मार्ग काहीच निघत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी, १३ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत महत्त्वपूर्ण बैठक घेत आहेत. या बैठकीमध्ये प्रश्नांवर तोडगा निघणार की पुन्हा आश्वासनेच मिळणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सविस्तर माहिती महापालिका प्रशासनाकडून संकलित करण्यात आली आहे. शुक्रवारी होणाऱ्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांपुढे ती ठेवली जाणार असल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप व आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली.प्रकल्पग्रस्तांच्या दोन मागण्या पूर्ण झाल्याशिवाय भामाआसखेड प्रकल्पाचे काम सुरू करू देणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील शेरे रद्द करावेत व ६५ टक्के भरल्याशिवाय जमिनींचा ताबा मिळावा, अशा मागण्या त्यांनी ठेवल्या आहेत. याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाचा असून, मुख्यमंत्र्यांपुढे हा प्रश्न ठेवण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. विकास आराखड्याला शासनाची अंतिम मंजुरी मिळत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत, त्यामुळे त्याला तातडीने मंजुरी देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शहराची पाण्याची गरज लक्षात घेता किमान ६ टीएमसी पाणी मुळशी धरणातून घ्यावे लागणार आहे. मुळशी धरण ते शहरापर्यंत पाइपलाइन टाकण्यासाठीचा आराखडा पालिकेने तयार केला आहे. मुळशी धरणामध्ये २८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. त्या पाण्यातून साडेतीनशे मेगावॉट इतकी वीजनिर्मिती होते. तितकी वीज शासनाने त्यांना उपलब्ध करून द्यावी आणि मुळशी धरणाचे पाणी पुणे, पिंपरी-चिंचवड यांना वाटून द्यावे, असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे मांडण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.पीएमपीच्या इमारती विकसित करण्यासाठी अडीच एफएसआय मिळावा, जायका प्रकल्पाच्या अडचणी दूर व्हाव्यात, पिंपरी सांडस येथील जागा कचरा प्रक्रियेसाठी मिळावी, अमृत योजना वेगाने मार्गी लागावी आदी विषय मुख्यमंत्र्यांपुढे मांडले जाणार आहेत. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, पालिकेतील गटनेते उपस्थित राहणार आहेत.