शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी घेतली मग्रारोहयो मजुरांची हजेरी

By admin | Updated: November 30, 2014 01:00 IST

सोनी चिमोटे, शांती बेठेकर, गोपी बेठेकर, सावजी कास्देकर, गणू मावस्कर, अशी एक-एक करीत पंधरा नावांची हजेरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शनिवारी सकाळी ११ वाजता मेळघाटातील मालूर येथे घेतली.

अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा : अहवाल सादर करण्याचे आदेशनरेंद्र जावरे - चिखलदरासोनी चिमोटे, शांती बेठेकर, गोपी बेठेकर, सावजी कास्देकर, गणू मावस्कर, अशी एक-एक करीत पंधरा नावांची हजेरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: शनिवारी सकाळी ११ वाजता मेळघाटातील मालूर येथे घेतली. हजेरी घेताना त्या नावाची व्यक्ती तीच का? यासाठी प्रत्यक्ष चेहरा ओळखसुध्दा करुन घेतली. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मग्रारोहयो) कामावरच आदिवासींसोबत संवाद साधला. केवळ आठ दिवसांपूर्वीच हे काम सुरू झाल्याचे उघडकीस आले.मुख्यमंत्री फडणवीस शनिवारी एक दिवसीय मेळघाट दौऱ्यावर होते. त्यांनी धारणी तालुक्यातील मालूर, चौराकुंड, हरिसाल, उतावली, राणापीसा आदी गावांना भेटी देऊन तेथील आरोग्य केंद्र, अंगणवाडी केंद्र, शाळांची स्थिती जाणून घेतली. त्यांनी थेट आदिवासींच्या घरात व गोठ्यात जाऊन पाहणी केली. गावकऱ्यांसोबत बसून संवाद साधला आणि त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.अधिकाऱ्यांना खडसावलेमालूर येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना (मग्रारोहयो) अंतर्गत केवळ आठ दिवसांपूर्वीच काम सुरु करण्यात आल्याचे आदिवासींनी सांगताच फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. माझा दौरा पाहून काम सुरु करण्यात आले हे योग्य नाही. मग्रारोहयो अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे सुरु करावीत आणि आदिवासींचे स्थानांतरण रोखण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. अधिकाऱ्यांनी आपला खोटारडेपणा थांबवावा, अशी ताकीद दिली.अधिकाऱ्यांकडे कामाची जबाबदारीआदिवासी गावांमधील शेतीसाठीसुद्धा जलसंधारणाचा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना दुबार पीक घेणे शक्य होणार आहे. मेळघाटातील प्रत्येक आदिवासीच्या हाताला काम देण्याची जबाबदारी घेण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात.लाल धुरात हरविला ताफामालूर गावाला मुख्यमंत्री भेट देणार असल्याचे एक दिवसापूर्वी प्रशासनाला सांगण्यात आले. सर्व यंत्रणा रात्रंदिवस कामाला लागली होती. मालूर गावापर्यंत रस्त्यावर लाल माती टाकण्यात आली. गावात निर्मल ग्रामस्वच्छता अभियानातून शौचालय उभारण्यात आले. पिण्याचे पाणी असलेल्या टाकीचे भाग्य रंगरंगोटीने उजळले. वाहनांचा ताफा जाताना लाल मातीच्या धुरामुळे पुढील रस्ताच बेपत्ता झाला होता. पांढऱ्याशुभ्र वाहनांवर लाल मातीचा थर बसला होता. शनिवारी जवळपास पाच तास दौरा करुन मुख्यमंत्र्यांनी आदिवासींना आश्वासित करीत निरोप घेतला.