शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावले

By admin | Updated: November 20, 2015 01:39 IST

अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध बैठकांमधून अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी झाडाझडती घेतली.

- अतुल कुलकर्णी,  मुंबई

अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध बैठकांमधून अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांनी झाडाझडती घेतली. मुख्यमंत्र्यांचा नूर पाहून जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनीही अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. कामे करायची नसतील तर फाईलवर तसे स्पष्ट लिहा; पण जागा अडकवून ठेवू नका, या शब्दात दोघांनी अधिकाऱ्यांना सुनावले. जलसंपदा विभागाच्या कामांचा जानेवारी महिन्यात आढावा घेण्यात आला होता. त्यावेळी कोणती कामे कधी पूर्ण होणार, कोण कसे काम करणार, याची विस्ताराने चर्चा झाली होती. त्याचे पुढे काय झाले? जानेवारीत आपण जेथे होतो तेथेच आजही आहोत. या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत. एखादे काम करायचे नसेल तर फाईलवर तुम्हाला जे वाटते ते स्पष्ट लिहा, पण कामे अडवून ठेवणे यापुढे खपवून घेतले जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी सुनावले. पोलिसांसाठी बांधायच्या घरांसाठीची बैठकही आज झाली. त्यावेळी पोलीस हाऊसिंगच्या बाबतीत काहीही घडत नाही, १ लाख घरे बांधायची असताना एक हजार घरांचा कसला प्रस्ताव घेऊन येता, हजार दोन हजार घरांनी काय होणार आहे, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. काही अधिकाऱ्यांनी जलसंपदा प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यास दहा महिने लागले, असा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यावर ज्यांना मान्यता होत्या त्या प्रकल्पांचे किती काम पुढे नेले गेले, कामे करण्याच्या बाबतीत नकारात्मक भूमिका बदला, अशा शब्दात महाजन यांनीही सुनावले. प्रस्ताव कागदावर विषयांचा खेळखंडोबाराज्य जल परिषद, जलसंपदा विभागाच्या कामांचा आढावा आणि पोलीस गृहनिर्माण अशा विविध विषयांवरील बैठका आज मुख्यमंत्र्यांनी घेतल्या. गेल्या वर्षभरात काहीही विशेष घडले नाही. प्रस्ताव पुढे सरकतच नाहीत, सगळ्या गोष्टी कागदावरच आहेत. सगळ्या विषयांचा पुरता खेळखंडोबा करून टाकला आहे. आम्ही लोकांना काय सांगायचे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी खडसावले.